01) अकोला ( Akola )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग पहिला दिनांक :- 24 एप्रिल 2023 वार - सोमवार
01) जिल्हा - अकोला माहिती
★ या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे.
★ अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.
★ १ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.
★ जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
★ अकोला जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. - अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोट व तेल्हारा.
★ अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा नदी आहे.
★ अकोला जिल्हा समुद्रापासून दूर आहे. जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे
★ बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील धरण-प्रकल्प जिल्ह्यात मोठा आहे.
★ अकोला जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे खरीप पीक आहे.
★ जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडतात.
★ तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन होते.
★ अकोला : येथे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे.
★ नरनाळा : येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे. अकोला जिल्ह्याच्या उत्तरेस नर्नाळा किल्ला आहे.
★ मूर्तिजापूर : संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
★ पातुर : हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
★ पारस : औष्णिक वीज निर्मिती केंद्र.
★ अकोट : सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.
★ हिवरखेड : आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक
राहील शेख इमरान
जयश्री खांडेभरड
कौशल्या सतीश जाधव
सुहानी मधुकर उईके
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें