20) पुणे ( Pune )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग विसावा दिनांक :- 31 मे 2023 वार - बुधवार
20) जिल्हा - पुणे माहिती
● पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.
● पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ''पुणे तिथे काय उणे '' प्रचलित आहे.
● पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
● पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
● पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
● छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
● छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
● संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आहे.
● संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू हे पुणे जिल्ह्यातील.
● पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते.
● पुण्यात १७३१ मध्ये बाजीरावांनी शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली.
● भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो.
● पुणे जिह्यातील धरणे:-
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, पिंपळगाव-जोग, वरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी, नाझरे, आंध्रा-vally, गुंजवणी, निरा-देवधर, उजनी, वळवण.
● पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखलेपु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे,पं. भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक
● महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत.
● पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत.
● हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत.
● पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत
● खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत.
● मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे.
● पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.
● पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
● पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
● मुंबई-बंगळुरू नॅशनल हायवेवर आंबेगाव मध्ये स्वामी नारायण महाराजांचे मंदीर आहे.
● मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे
● पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत.
● भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) (हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
● भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) (हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
● जेजुरी : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे
● भीमाशंकर : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे
● भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे
● लोणावळा - खंडाळा लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे
● पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे
● आगाखान पॅलेस गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
● लाल महाल - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. शिवाजी महाराज व जिजाबाई येथे वास्तव्यास होते).
● आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
● पुणे जिल्ह्यात चौदा तालुके आहेत - खालीलप्रमाणे तालुके आहेत - जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, वेल्हे, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुणे शहर
● पुणे जिल्ह्यात चार लोकसभा तर एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत.
● जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
● पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे.
● अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:- थेऊर येथील चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, मोरगावचा मोरेश्वर, ओझरचा विघ्नहर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज हे ते पाच विनायक होत.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें