09) चंद्रपूर
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग नववा दिनांक :- 03 मे 2023 वार - बुधवार
09) जिल्हा - चंद्रपूर माहिती
★ चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे.
★ चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत.
चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले.
★ इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला.
★ चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.
★ चंद्रपूरात अनेक चुन्याच्या खाणी देखिल आहेत.
★ जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.
★ हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य पीके :- तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही आहेत.
★ जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे.
★ चंद्रपूर जिल्ह्यात मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी या भाषा देखिल प्रचलीत आहेत.
★ चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुके आहेत - चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमुर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती व बल्लारपूर
★ स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा अशी 1980 पासून मागणी आहे.
★ चिमूर आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते.
★ नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या खेडय़ातील दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी एच.एम.टी. व डी.आर.के. यासारख्या उच्च प्रतीच्या भाताचे अनेक वाण संशोधित करून नागभीड तालुक्याला देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली.
★ नागभीड या तालुक्यात सर्वप्रथम एकोणवीसशे 40 ते 50च्या दशकात वामन विगम हे बालकवी होऊन गेले. त्यांच्या अनेक रचना महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.
★ पहिले चारोळीकार प्रा. डॉ. राजन जयस्वाल हे नागभीडचे होय.
★ संजय वि. येरणे हे 21 व्या शतकातील नागभीडचा साहित्य वारसा चालवणारे समृद्ध वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.
★ ब्रम्हपुरी शहराच्या वायव्य सीमेवर वसलेल्या धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी नामक संस्थेला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
★ ब्रह्मपुरीमध्ये गणपती उत्सवाला "ब्रम्हपुरीचा राजा" असे म्हणतात. माननीय बाबा खानोरकर हे या उत्सवाचे जनक आहेत.
★ ब्रह्मपुरी शहराला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते.
★ बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम याच चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा गावाजवळ आहे.
★ ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान व्याघ्रप्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे.
★ बल्लारशहा येथे कागद निर्मितीचा कारखाना आहे.
★ सिमेंट - अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी हे महत्त्वाचे उद्योग जिल्ह्यात आहेत.
★ दुर्गापूर येथे महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र आहे.
★ चंद्रपूर येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे .
★ चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी तलाव प्रसिद्ध आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद ..........!
एकदम स्तुत्य उपक्रम सर
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएं