05) धाराशिव
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग पाचवा दिनांक :- 28 एप्रिल 2023 वार - शुक्रवार
05) जिल्हा - धाराशिव माहिती
◆ फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचे निर्णय राज्य सरकरच्या वतीने करण्यात आले.
◆ धाराशिवच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.
◆ उन्हाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते.
◆ ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.
◆ जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे.
◆ पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो.
◆ सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर आहे.
◆ धाराशिव जिल्ह्यात एकूण 08 तालुके आहेत - धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परांडा
◆ महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे.
◆ हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.
◆ तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते.
◆ आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असत.
◆ येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
◆ डोमगाव येथे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची समाधी आहे.
◆ श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचे एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
◆ येडशी या गावात रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे
◆ हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातच्या मध्यभागी आहे.
◆ तेर येथील पुरातणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट
◆ कळंब शहर हे कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असून शहरात नामांकित वस्त्रदालने आहेत.
◆ भूम तालुका मुख्यालयापासुन जवळच कुंथलगिरी हे सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.
◆ परंडा किल्ला हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता. बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.
◆ नळदुर्ग हा भुईकोट किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.
◆ धाराशिव जिल्हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
◆ धाराशिव जिल्ह्यात एकूण 01 लोकसभा आणि 04 विधानसभा मतदारसंघ आहेत
◆ धाराशिव जिल्ह्यात एकूण 08 नगरपरिषद आहेत
◆ धाराशिव जिल्ह्यात एकूण 02 नगरपंचायत आहेत
◆ धाराशिव जिल्ह्यात एकूण 54 जिल्हा परिषदेचे मतदार संघ आहेत.
◆ मराठी ही येथील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे
◆ धाराशिव बसस्थानकावरून धावणारी तुळजापूर-धाराशिव-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते.
◆ या जिल्ह्यात बस आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें