03) अहमदनगर ( Ahmadnagar )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग तिसरा दिनांक :- 26 एप्रिल 2023 वार - बुधवार

03) जिल्हा - अहमदनगर माहिती

★ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. 

★ अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत.

★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई हरीश्चंद्राच्या डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. 

★ जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो.

 ★ उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोडभीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

★ गोदावरीभीमासीनामुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. 

★ गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. 

★ प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

★ अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. 

★ महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. 

★ अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. 

★ १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबा-शिर्डी हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. 

★ संंगमनेरहून भंडारदरा धरणाकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

★ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 

 ★ डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी 1923 मध्ये जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली, तसेच जून 1950 मध्ये राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला.

★ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. 

★ भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.

★ अहमदशहा बहिरी या निजामशहाच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले

★ नगरमधील भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. 

★ याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

★ अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.

★ ज्वारी हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. 

★ महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या याच जिल्ह्यात आढळून येते. 

★ जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. 

★ जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

★ महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. 

★ अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे.

★ शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदीर याच जिल्ह्यात आहे. 

★ एका ही दाराला दरवाजा नसलेले गाव शनी-शिंगणापूर गाव देखील याच अहमदनगर जिल्ह्यात आहे.

★ समाजसेवक किशन बाबुराव उर्फ अण्णा हजारे यांचे आदर्श गाव राळेगणसिद्धी आणि पोपटराव पवार यांचे आदर्श गाव हिवरे बाजार याच जिल्ह्यात आहेत. 

★ अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत

वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


13 पैकी 9 वा 13 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER

13 पैकी 7 वा 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER

13 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST

13 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.

आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769

धन्यवाद ..........! 

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक

साईनाथ कल्याणकार, 
विष्णू गोपीनाथ पाटील, 
नीरज कानडे, 
धनश्री राजेंद्र आंबटवार, 
ऐश्वर्या इडेवार, 
Unkonwn नाव

सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )