06) कोल्हापूर

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग सहावा दिनांक :- 29 एप्रिल 2023 वार - शनिवार

06) जिल्हा - कोल्हापूर माहिती

★ कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. 

★ कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रमुख नदी आहे. 

★ शहराच्या आसपास पन्हाळागगनबावडानृसिंहवाडीखिद्रापूरविशाळगडराधानगरीदाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी ठिकाणे आहेत. 

★ छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. 

★ कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.

★ कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असुन त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे

★ कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

★ तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत.

★ कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत.

★ इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी व संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. 

★ हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.

★ सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे.

★ जिल्ह्यातील इचलकरंजी या गावाला महाराष्ट्राचे मॅंचेंस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे.

★ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकुळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकुळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअऱ्या) या संघाच्या सभासद आहेत. 

★ जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.

★ पूर्वीपासूनच्या ऊसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे

★ जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो.

★ कोल्हापुरी चप्पल जगात प्रसिद्ध आहे, कागल तालुक्यातील कापशी हे गाव या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.

★ जिल्ह्यातील राधानगरी धरण भारतातील पहिले मातीचे धरण आहे.

★ कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शाहूजी म्युझियम हे खास आकर्षण आहे.

★ कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते.

★ जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो.

★ रंकाळा तलाव राजा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. 

★ शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे

★ दाजीपुर कोल्हापूरच्या वन्य जीवांची ओळख करून देणारे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. 

★ गगनबावडा येथे हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा, गगनगिरी मंदिर, बावडेकर वाडा आहे

★ सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे.

★ कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे.

★ मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात कोल्हापुरातला तांबडा रस्सा (मटणाचे सूप ), पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे ),मटणाचे लोणचे, खिमा राईस बॉल्स प्रसिद्ध आहेत.

★ कोल्हपूरची लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. 

★ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

 ★ कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे.

★ इ.स.१९६२मध्ये महाराष्ट्र शासनद्वारे स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.

★ मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.

★ कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापुरातील लोकप्रिय खेळ आहे.

★ खासबाग हे भारतातील एकमेव कुस्तीचे मैदान आहे. 

★ जिह्यातील नरसोबाची वाडी उर्फ नृसिंहवाडी हे नृसिंह सरस्वतींचे मंदिर असलेले गाव प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
 
★ वाडीरत्‍नागिरीच्या डोंगरावरील जोतीबा मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर हे शिलाहार शैलीतील स्थापत्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवमंदिर आहे. 

★ कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

★ कागल येथील गैबीपिरसाहेब दर्गा हे देखील प्रमुख आकर्षण आहे.

वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

कोल्हापूर प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

03) अहिल्यानगर ( Ahilyanagar )

10) जळगाव