विशेष भाग महाराष्ट्र ( Maharashtra )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; महाराष्ट्र राज्य
विशेष भाग दिनांक :- 01 मे 2023 वार - सोमवार
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे 1960 रोजी झाली.
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांना मनस्वी शुभेच्छा ...!
आपल्या महाराष्ट्राविषयी माहिती
1. महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.
2. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असून कवी राजा बढे लिखित जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे.
3. महाराष्ट्र राज्य भारत देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.
4. सुरवातीच्या काळात महाराष्ट्राला बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे स्टेट या नावाने ओळखले जायचे.
5. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची सुमारे 1,646 मीटर आहे.
6. महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे तर मुंबई शहर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे.
7. गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.
8. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत.
9. त्र्यंबकेश्वर मंदिराची सुरुवात बालाजी बाजीराव यांनी केली होती.
10. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या रूपामध्ये ओळखले जाते. सम्राट अशोकाच्या काळात याला राष्ट्रीय आणि त्यानंतर महानराष्ट्र या रुपात ओळखले जायचे.
11. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो.
12. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे.
13. महाराष्ट्र राज्यात कोळसा, लोह, मॅगनीज, बॉक्साईट, नैसर्गिक गॅस हे खनिजे अधिक प्रमाणात आढळतात.
14. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी, होळी व गणेशोत्सव हे सण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरे करतात.
15. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणी महाराष्ट्र राज्यात आहे.
16. भारतातील पहिला चित्रपट महाराष्ट्रात बनवला गेला होता.
17. दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा भारतातील पहिला चित्रपट बनवला होता.
18. महाराष्ट्र भारतातील एकमेव राज्य आहे, जेथे दोन मेट्रो शहरे आहेत पहिले मुंबई आणि दुसरे पुणे शहर.
19. महाराष्ट्रात नवापूर म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे.
20. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदरसंघ आहेत.
21. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
22. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे कोणत्याही घराला दरवाजे नाहीत.
23. महाराष्ट्रातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे.
24. भारतामध्ये पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या ठिकाणी चालली होती.
25. राज्यात जवळजवळ 16 टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा आहे.
26. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.
25. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 कि.मी. किनारपट्टी लाभली आहे.
26. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा असे महान संत लाभले आहेत, त्यामुळेच महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.
27. अभिनेते, राजकारणी आणि खेळाडू महाराष्ट्रातून तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत.
28. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीतले आहेत.
29. १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले.
वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याची माहिती वाचून खालील लिंकवर क्लीक करा आणि प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 वा 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 वा 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? हे खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड, 9423625769
धन्यवाद .......!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें