Summer Knowledge Park
नमस्कार
*उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी*
राज्य शासनाच्या निर्णयाने 21 एप्रिल 2023 पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र दिनी म्हणजे 01 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्या जाते. मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने दहा दिवस अगोदरच विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे, याचा विद्यार्थ्यांना आनंदच झाला असेल, यात शंका नाही. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना घर बसल्या सहज हसत खेळत आपला देश, त्यातील घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश, आपला महाराष्ट्र आणि त्यातील सर्व जिल्हे यांची माहिती देण्यासाठी खास उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा कालावधी दिनांक 24 एप्रिल 2023 ते 14 जून 2023 असा 52 दिवसांचा आहे. या कालावधीत प्रसारित होणारी ही माहिती शालेय विद्यार्थ्यांसह, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि इतरांना देखील उपयोगी पडणारे आहे. तेव्हा या उपक्रमात मिळणारी माहिती वाचून आपले ज्ञान वाढवू या.
प्रश्नांची उत्तरे कशी देता येईल यासाठी वरील माहितीच्या आधारावर तयारी केलेली प्रश्नपत्रिका आज सोडवू या.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करून आपले संपूर्ण नाव जिल्ह्यासह नमूद करावे आणि प्रश्नांची उत्तरे निवड करावी.
रोज देण्यात येणारी माहिती व प्रश्नोत्तरे वहीत लिहून घेण्यास शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.
धन्यवाद .......!
निर्मिती व संकल्पना - नासा येवतीकर 9423625769
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें