08) गोंदिया

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग आठवा दिनांक :- 02 मे 2023 वार - मंगळवार

08) जिल्हा - गोंदिया माहिती
गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता.

◆ गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 01 मे 1999 रोजी करण्यात आली. 

◆ गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे.

◆ गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. 

◆ जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. 

◆ भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. 

◆ वैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. 

◆ जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.


◆ पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.

◆ गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.

◆ गोंदिया जिल्ह्या्त एकूण 08 तालुके आहेत - अर्जुनी/मोरगावआमगावसडकअर्जुनीसालेकसागोंदियागोरेगावतिरोडा व देवरी

◆ अर्जुनी मोरेगाव येथेप्रसिद्ध नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व इटियाडोह धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

◆ देवरी हा तालुका गोंदिया जिह्लातील तीन नक्षलग्रस्त तालुक्या पैकी एक असून "रेड कॉरिडोर "चा भाग आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER

10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER

10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST

10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.

आपलाच,
नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )