11) जालना
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग अकरावा दिनांक :- 05 मे 2023 वार - शुक्रवार
11) जिल्हा - जालना माहिती
● जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे.
● मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो.
● जालना जिल्ह्यात एक लोकसभा असून पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.
● जालना हा छत्रपती संभाजीनगरचा तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्हा’ झाला.
● जालना जिल्ह्यात 08 तालुके आहेत - भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा
● मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेले जालना हे शहर व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे.
● जालना जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्हा असून, औरंगाबाद/ छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्चिम दिशेला आहे. उत्तरेला, जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्हा आहे.
● जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध आहे.
● जिल्ह्यात बिडीचेही भरपूर कारखाने आहेत.
● जालना जिल्हा मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
● महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत.
● केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते
● गोदावरी नदी अंदाजे ६० कि.मी. इतकी जिल्ह्यातून वाहते.
● जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे.
● अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे.
● परांडा ता.अंबड जि. जालना येथे हजरत सैय्यद हाफिज अलाउद्दीन जिया चिश्ती रहमतुल्लाह अलाही उर्फ सकलाधी बाबा यांची दर्गा आहे.
● राजूर हे गणेश पुराणातील गणपतीचे पूर्ण पिठ मानले गेले आहे. अंगारिका चतुर्थीला मंदिरात मोठ्या प्रमाणात मेळा भरतो.
● भोकरदन शहराला लागून असलेल्या आलापुर या गावात रामेश्वर-सिद्धेश्वर मंदीर आहे.
● बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर आहे जे की जिह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे.
● बदनापूर तालुक्यातील अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे आणि वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे
● परतूर गावाचे प्राचीन नाव प्रल्हादपूर आहे.
● परतूर येथील देशपांडे गल्लीत नृसिंह मंदिर आहे. मंदिराजवळ करक्षेत्र कुंड आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर याच कुंडात नृसिंहाने आपले हात धुतले अशी आख्यायिका आहे.
● घनसांवगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदिरही आहे
● हेलस ता. मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे.
● भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्य हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पहेी आहेत.
● वालसावंगी येथील चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे.
● रोहिलागड हा जालना जिल्ह्यातील अर्धवट मानला जाणार किल्ला आहे.
● जाफराबाद तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
● अलीकडेच या जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर ड्रायपोर्ट प्रकल्प उभारला जात आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
खूप छान
जवाब देंहटाएं