उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग बारावा दिनांक :- 06 मे 2023 वार - शनिवार
12) जिल्हा - ठाणे माहिती
★ ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
★ ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत.
★ ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे.
★ ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
★ ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र व मुंबई जिल्हा, उत्तरेस पालघर जिल्हा, पूर्वेस अहमदनगर जिल्हा, व नाशिक जिल्हा तर दक्षिण भागात रायगड जिल्हा व पुणे जिल्हा आहे
★ ठाणे जिल्ह्यात एकूण 07 तालुके आहेत - ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि मुरबाड
★ मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाजवळील मोरोशी गाव येथुन २ किमी. अंतरावर प्रसिद्ध भैरवगडचा किल्ला आहे
★ उल्हासनगर तालुक्यात ग्रामीण भाग नाही त्यामुळे एकही गाव नाही.
★ शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातील १००% पेसा क्षेत्र तालुका आहे.
★ शहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो.
★ शहापूर तालुक्यामध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा हे प्रमुख धरण आहेत.
★ अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे.
★ या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे.
★ अंबरनाथ येथे आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.
★ कल्याणला मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबईच्या जवळ आहे.
★ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आहे.
★ ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात.
★ ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे पक्षी निरीक्षकांचे नंदनवन आहे.
★ ठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.
★ ठाणे जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे.
★ ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे
★ तानसा वन्यजीव अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यात स्थित वन्यजीव अभयारण्य आहे.
★ घोडबंदर किल्ला सर्वात जुना आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक असून १६ व्या शतकात बांधण्यात आलेला आहे
★ भिवंडीला 'भारताचे मँचेस्टर' म्हणूनही ओळखली जाते.
★ टिटवाळा मंदिर, सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिर आणि तीर्थस्थळांपैकी एक आहे
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें