13) धुळे
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग तेरावा दिनांक :- 07 मे 2023 वार - रविवार
13) जिल्हा - धुळे माहिती
◆ तापी नदी ही धुळे जिल्ह्याची प्रमुख नदी आहे.
◆ धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी आहे.
◆ धुळे जिल्ह्याच्या पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे.
◆ धुळे जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत.
◆ शिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्व. स्मिता पाटील हिचे जन्मगाव आहे.
◆ शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आजोळ आहे.
◆ इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते विश्वनाथ काशिनाथ राजवाडे याच धुळे शहरातील होते.
◆ धुळेच्या मध्यवर्ती ठिकाणी राजवाडे संशोधन मंडळ आहे.
◆ पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो
◆ धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, बाजरी, भात, मिरची, ऊस, केळी, द्राक्ष ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे
◆ धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.
◆ धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे जिथे, मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात.
◆ क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण आहे.
◆ धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे.
◆ निजामपूर याठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहे.
◆ शिरपूर तालुक्याने पाणी व्यवस्थापन क्षेत्रात पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमाद्वारे फार छान कामगिरी केली आहे. शिरपूर पॅटर्न म्हणून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
◆ जिल्ह्याचे तापमान कमाल ४३° सेल्सिअस तर किमान ४° सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ६०० मिमी. इतका पडतो.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें