14) नंदुरबार ( Nandurbar )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग चौदावा दिनांक :- 08 मे 2023 वार - सोमवार
14) जिल्हा - नंदुरबार माहिती
◆ नंदुरबार हा महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे.
◆ १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
◆ नंदुरबार जिल्ह्यात 06 तालुके आहेत - नंदुरबार ,नवापुर ,शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव)
◆ नंदुरबार जिल्ह्यात एक लोकसभा असून 04 विधानसभा मतदारसंघ आहेत.
◆ प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात.
◆ नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे.
◆ नंदुरबार येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बाल हुतात्मा शिरीषकुमार याचे स्मारक आहे.
◆ शहादा तालुक्यात उनबदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
◆ महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ
◆ नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उमटी गावातील देवनंद नदीवरील मनमोहक धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा आहे.
◆ दाब हे अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत याहा मोगी माताचे जन्मस्थान व थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे.
◆ अंस्तबा हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे ज्यांची उंची 1325 मीटर आहे व अश्वथामा ऋषी महाराजचे वास्तव्य होते.
◆ निसर्गरम्य दहेल धबधबा हा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यात या दहेल गावांमध्ये आहे.
◆ सय्यद अलाऊद्दीन ऊर्फ इमाम साहेब की दर्गा नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे
◆ बाराधारा हा धबधबा नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव या गावांमध्ये आहे. ( बारा वेगवेगळ्या प्रकारच्या धारा येथे पाहायला मिळतात. )
◆ प्रकाशा हे शहादा मधील शंकराचे जागृत देवस्थान आहे, हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.
◆ प्रकाशा ठिकाणाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
◆ नवापूर रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें