16) नागपूर ( Nagpur )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग सोळावा दिनांक :- 10 मे 2023 वार - बुधवार
16) जिल्हा - नागपूर माहिती
◆ नागपूर शहर तीनशे वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहे.
◆ या शहराची स्थापना गोंड राजा बख्त बुलंद शहा या राजाने १७०२ या वर्षी नाग नदीकाठी नागपूर शहर वसविले.
◆ भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे.
◆ देशाच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात.
◆ नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.
◆ नागपूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश, वायव्येस अमरावती जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा, पूर्वेस भंडारा, पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.
◆ नागपूर जिल्ह्यात 14 तालुके आहेत - काटोल, रामटेक, सावनेर, हिंगणा, नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वरमौदा, भिवापूर, कुही, पारशिवणी.
◆ संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.
◆ महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.
◆ नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते.
◆ कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते.
◆ पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थान कुही तालुक्यात आहे.
◆ नागपूर जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे.
◆ नागपूर जिल्ह्यात मँगनीजच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत
◆ त्याचबरोबर काही भागांत संगमरवर, चुनखडी, लोह खनिज, डोलोमाइट, टंगस्टन आणि दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
◆ वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
◆ बुटीबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
◆ नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे.
◆ नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.
◆ केंद्रीय कापूस संशोधन केंद्र’ नागपूर येथे आहे.
◆ नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी करण्यात आली असून, सध्या हे विद्यापीठ ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’ या नावाने ओळखले जाते.
◆ नागपूर जिल्ह्यात बोर अभयारण्य (नागपूर व वर्धा जिल्हा मिळून), पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प आहे.
◆ केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (नीरी) स्थापना नागपूरमध्ये १९५८ मध्ये करण्यात आली असून, देशपातळीवर कार्य करणाऱ्या या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
◆ मराठीतील लोकप्रिय नाटककार राम गणेश गडकरी यांचे खिंडसी (तालुका सावनेर) येथे १९१९ मध्ये निधन झाले.
◆ नागपूर जिल्ह्यात मार्च २०१९ मधे मेट्रो सेवा सुरु करण्यात आली.
◆ भिवापूर तालुका मिरची उत्पादनात आघाडीवर आहे.
◆ कामठी येथील बौद्ध विहार ड्रॅगन पॅलेस मंदिर हे ‘लोटस टेंपल’ (कमळ मंदिर/कमळ विहार) नावाने ओळखले जाते.
◆ रामटेक येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय आहे.
◆ राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. येथे राममंदिर आहे.
◆ नरखेड शहराची संत्रा नगरी म्हणून एक वेगळी ओळख आहे, इथे भरपूर प्रमाणात संत्रा उत्पादन होते.
◆ संपूर्ण देशात नागपूरची ओळख संत्रा नगरी अशी आहे.
◆ नागपूर येथील दीक्षाभूमीला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
◆ नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालयही आहे. स्थानिक लोकं यास 'अजबबंगला' असेही म्हणतात.
◆ नागपूर हे मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
◆ महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर शहरात भरविली जाते.
◆ अलीकडेच भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून नागपूरला मान्यता मिळाली आहे.
◆ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुर येथे आहे.
◆ नाग नदीमुळेच या शहराचे नाव नागपूर असे ठेवण्यात आले.
◆ टाटा समुहाने 1 जानेवारी 1877 मध्ये देशातील पहिली टेक्सटाईल मिल नागपूर येथे सुरू केली.
◆ नागपूर शहरातील सर्वात मोठया भेटीची ठिकाणे म्हणजे कस्तुरचंद पार्क.
◆ सुर्यवंशी राजा यांनी स्थापित केलेले जुने शहर म्हणजे रामटेक येथील नगरधन किल्ला.
◆ ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला प्रादेशिक सैन्याचे कार्यालय आहे.
◆ नागपूर शहरातील मारबत महोत्सव हा या भागाचा एक महत्वाचा सण आहे
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
RBI चे कार्यालय नागपूर
जवाब देंहटाएं