17) नाशिक ( Nashik )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग सोळावा दिनांक :- 11 मे 2023 वार - गुरूवार

17) जिल्हा - नाशिक माहिती

● नाशिक शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे.

● जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अश्यापाच नावाने ओळखले जाते.

● महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते. म्हणून नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

● नाशिक जिल्हा दारू च्या उत्पादनाकरता देखील ओळखला जातो त्यामुळे याला “भारताची वाईन कॅपीटल” म्हणुनही संबोधतात.

● नाशिक या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

● नाशिक जिल्ह्यात दोन महानगरपालिका असून नऊ नगरपालिका आहेत.

● सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांची नाशिक ही कर्मभूमी आहे.

● नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला- धुळे जिल्हा, पूर्वेला- जळगाव जिल्हा, अग्नेयेला – औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला – ठाणे जिल्हा, पश्चिमेला – नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा, वायव्येला- डांग जिल्हा आहे.

● नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहेत - सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर.

● लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.

● बागलाणमध्यें कळवण येथील जोगेश्वर देवळांतील नक्षीकाम फार सुरेख आहे.

● स्वातंत्र्यवीर सावरकरांनी  ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेची स्थापना नाशकात केली.

● नाशिक जिल्ह्यातील प्रमुख महत्त्वाची वनस्पती म्हणजे साग आहे.

● नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे.

● महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई (१,६४६ मी.) याच नाशिक जिल्ह्यात आहे.

● जिल्ह्यात मालेगाव व येवले ही हातमाग कापडउद्योग केंद्रे असून तेथे सुती आणि रेशमी कापड, लुगडी, जरीच्या पैठण्या, पितांबर इ. विणले जातात.

● ओझरजवळ किर्लोस्कर कंपनीचा ट्रॅक्टरचा कारखाना आहे. 

● नाशिकजवळील एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

● ओझर येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे.

● रावळगाव येथे चॉकलेट्स व टॉफिज तयार करण्याचा उद्योग आहे.

● पिंपळगाव बसवंतजवळ द्राक्षापासून ‘पिबोला’पेये बनविण्याचा कारखाना आहे.

● बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिकपासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.


● दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो.

● नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात रामकुंड आहे. अस्थी विसर्जीत करण्याकरता येथे गर्दी करतात.

● साडेतीन शक्तीपीठापैकी एक वणीची सप्तशृंगी देवी कळवण तालुक्यात उंच गडावर स्थित आहे.

● त्रंबकेश्वरपासून 10 किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे.

● नाशिक जिल्ह्यातील चांदवड या तालुक्यामध्ये धोडप किल्ला आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंचीचा किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा क्रमांक दुसरा लागतो. 

● इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. 

● गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.

● नाशिक जिल्हयाला मिनी महाराष्ट्र देखील म्हंटल्या जाते.

● मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्रातील तीसरे सर्वात मोठे शहर आहे.

● नाशिक रोड भागात संपुर्ण संगमरवरी बांधकाम असलेले मुक्तीधाम नावाचे भव्य मंदीर प्रसिद्ध आहे. 

● नाशिक शहरातील पंचवटी ( म्हणजे पाच वडांचा समूह ) येथे अनेक मंदिरे आहेत. 

● नाशिकच्या सौंदर्यावर फिदा झालेल्या मोगलांनी नाशिकचे नाव गुलशनाबाद असे ठेवले होते. 

● नाशिक येथे काळाराम मंदीर आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.

● नाशिकमधील काळाराम मंदिरात तत्कालीन अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० मध्ये ‘मंदिर प्रवेश सत्याग्रह चळवळ नाशिक येथूनच सुरु केली.

● तपोवन म्हणजे ‘’तपस्वी लोकांचे वन’’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे.

● चांदवड येथे श्री रेणुका माता मंदीर असून त्यांचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले

● निफाड व लासलगाव तालुक्यात कांद्याचे व लसणाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

● जिल्ह्यात गोदावरी नदीवर गंगापूर धरण असून हे देशातील पहिले मातीचे धरण होय.

● महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक शहरात आहे.

● नाशिक येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी आहे.

● भारत सरकारद्वारा संचालित भारत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे असून, येथे चलनी नोटा व टपाल तिकिटे, इंदिरा विकास पत्रे, किसान विकास पत्रे, पोस्टल ऑर्डर्स, पासपोर्ट व टपाल तिकीट आदींची छपाई केली जाते.

● पोलीस उप अधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी येथे आहे.

● देवळाली येथे भारतीय लष्कराचा तोफखाना विभागाची छावणी आहे.

● गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले व ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाणारे नांदूर-मध्यमेश्वर नाशिक जिल्ह्यात आहे.

● भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म याच जिल्ह्यातील निफाड येथे झाला.

● भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात झाला.

● सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये "हातगड" किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम ह्या "हातगड " किल्ल्यावर होता ,अशी आख्यायिका आहे .

● सुरगाणा तालुक्यातील भिंतघर हे गाव "गुलाबी गाव" म्हणून ओळखले जाते. या गावात सगळ्या घराना गुलाबी रंग दिला आहे. ही संकल्पना एका जिल्हा परिषद शिक्षकानी रूजवली.

● भरपूर पावसामुळे इगतपुरीला नाशिकच्या पावसाचे माहेरघर असही म्हणतात. या तालुक्यात भाताचे पिक घेतले जाते.

● इगतपुरी येथे विपश्यना केंद्र आहे.

● सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे बंजारा समाजाचे कुलदैवत सतिमाता व सामतदादा हे देवस्थान आहे.लाखो भाविक येथे दरवर्षी येतात.याच गावात श्रीशैल्य पिठाचे अर्धपीठ आहे.

● दिंडोरी येथे श्री स्वामी समर्थ चे मठ आहे. परमपूज्य मोरे दादा यांनी या मठाची स्थापना केली.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


नाशिक जिल्हा प्रश्नोत्त

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक

एकनाथ रमेश पोतदार, श्रीनाथ रमेश पोतदार, शुभम संजय विभूते, तेजश्री शिवाजी भांडवलकर, मनिषा देवरे, दिनेश प्रल्हाद डोंगरे, कृष्णा हिंमत पाटील, नीरज संजय कानडे, रुपेश रामकीशन कौटकर, निलेश देवरे, अनन्या भारत इंगोले, विजय नरसिंह भवरे, वृषाली जाधव, धोंडिबा गंगाराम गायकवाड, उदांत दुशांत निमकर, निधी निमकर, मिरासा नासर शेख, विनीत वासनिक, बाबूलाल काशीराम डहाके, पूर्वजा अजय तोडसाम, पल्लवी, सांची केळकर, उषा निमकर, आरती बालकिशन मोकळे

सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )