18) परभणी ( Parbhani )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग अठरावा दिनांक :- 12 मे 2023 वार - शुक्रवार

18) जिल्हा - परभणी माहिती


◆ परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. 

◆ हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. 

◆ परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत.

◆ परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले 

◆ परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. 

◆ परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.

◆ परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. 

◆ शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथे झाला आहे, असे भक्त मंडळी मानतात.

◆ संत भोजलिंग काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.

◆ परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.

◆ परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी, दुधना आहे.

◆ परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक म्हणजे ज्वारी. परभणी जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. 

◆ परभणी जिल्ह्याची समुद्रसाटीपासूनची उंची 457.50 मी. आहे.

◆ गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

◆ गंगाखेड येथे 300 वर्षांपूर्वी बांधलेले बालाजी मंदीर आहे. 

◆ गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.

◆ गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम मिठाई संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

◆ परभणी जिल्ह्यात 09 तालुके आहेत, गंगाखेडजिंतूरसेलूपरभणीपाथरीपालमपूर्णामानवतसोनपेठ

◆ जिंतूर हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. 

◆ जिंतूर शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे.

◆ जिंतूरपासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. 

◆ जिंतूर शहरा पासून ३० किमी अंतरावर असलेले येलदरी धरण हे संपूर्ण मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.

◆ रुद्रप्रयाग येथील पूर्णा, दुधना आणि कपरा त्रिधारा संगम प्रेक्षणीय आहे,

◆ श्री स्वामी सच्चिदानंदजी सरस्वती यांनी बांधलेले संगमरवराचे भव्य मंदिर, मृत्युंजय पारदेश्वर मंदिर हे परभणीपासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे.

◆ श्रीराम बाग ऍग्रो मेडिकल टुरिझम अँड फन पार्क हे महाराष्ट्र राज्यातील धर्मपुरी, परभणी जिल्ह्यात आहे. हे परभणी शहराच्या मध्यभागी सुमारे ८ किमी अंतरावर आहे.


◆ सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. 

◆ सेलू या गावचे मूळ नाव शाळूवाडी होते. कारण या गावांमध्ये शाळू ज्वारीचे पीक जास्त येत होते. नंतर शाळू वाडी अपभ्रंश होऊन सेलूवाडी हे नाव झाले व पुढे त्याचे सेलू हे नाव झाले

◆ पालम येथे गोदावरी नदी मध्ये प्रेक्षणीय जांभूळबेट आहे.

◆ पुर्णा हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. 

◆ येथील पुर्णा रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.

◆ मानवत शहराचे पूर्वीचे नाव मणिपूर हे होते.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

परभणी जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक

एकनाथ रमेश पोतदार, श्रीनाथ रमेश पोतदार, शुभम संजय विभूते, तेजश्री शिवाजी भांडवलकर, मनिषा देवरे, दिनेश प्रल्हाद डोंगरे, कृष्णा हिंमत पाटील, नीरज संजय कानडे, रुपेश रामकीशन कौटकर, निलेश देवरे, अनन्या भारत इंगोले, विजय नरसिंह भवरे, वृषाली जाधव, धोंडिबा गंगाराम गायकवाड, उदांत दुशांत निमकर, निधी निमकर, मिरासा नासर शेख, विनीत वासनिक, बाबूलाल काशीराम डहाके, पूर्वजा अजय तोडसाम, पल्लवी, सांची केळकर, उषा निमकर, आरती बालकिशन मोकळे

सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )