19) पालघर ( Palghar )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग एकोणीसावा
दिनांक :- 13 मे 2023 वार - शनिवार
19) जिल्हा - पालघर माहिती
★ पालघर जिल्हा हा कोकण विभागातील जिल्हा आहे.
★ ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी पालघर जिल्हा निर्मित करण्यात आलेला आहे.
★ महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे.
★ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली.
★ पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.
★ कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे.
★ पालघर जिल्हा उत्तरेकडील डहाणूपासून सुरू होऊन नायगाव येथे संपतो.
★ पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
★ वाडा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो. येथील वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
★ महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.
★ 'साखरशेत 'हे वाडा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
★ जव्हार तालुक्यातील गावंधपाडा येथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.
★ जव्हार शहराला ‘पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर’ असेही म्हटले जाते.
★ जव्हार हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १७०० फूट उंचीवर आहे.
★ मोखाडा येथे 'सूर्यमाळ' हे थंड हवेचे ठिकाण आहे.
★ बोहाडा उत्सव पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ( होळीनंतर दुसऱ्या दिवशीचा उत्सव म्हणजे बोहाडा )
★ डहाणू तालुका वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.
★ पालघर जिल्ह्यातून वाहणारी मुख्य नदी वैतरणा असून तिची लांबी 154 कि.मी. आहे.
★ वसई तालुक्यात अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग’ किंवा ‘जंजिरे अर्नाळा’ म्हणून ही ओळखला जातो.
★ १५१६ मध्ये सुल्तान महमूद बेगडा यांनी अर्नाळा किल्ला बांधला.
★ वसईतील सुरुची समुद्रकिनारा हा पर्यावरण अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
★ विक्रमगड येथील पलूचा धबधबा सुमारे 300 फूट उंचीचा हा धबधबा आहे. धबधब्याच उगमस्थान लेन्ड्री नदीत आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी मान्सून हा सर्वोत्तम हंगाम आहे.
★ वसई किल्ला, ज्याला बसिन म्हणूनही ओळखले जाते.
★ वसईचा किल्ला सागरी किनारपट्टी हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले होते.
★ डहाणू शहर चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे.
★ केळवा फोर्ट, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला एक ऐतिहासिकदृष्ट्या, सुंदर आणि प्रसन्न केळवा महत्वाचा किल्ला दक्षिणेकडील ओवरनंतर स्थित आहे. हा किल्ला पालघर तालुक्यात आहे.
★ काळदुर्ग किल्ला हा डोंगरी प्रकारचा किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात आहे. या किल्ल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक
एकनाथ रमेश पोतदार, श्रीनाथ रमेश पोतदार, शुभम संजय विभूते, तेजश्री शिवाजी भांडवलकर, मनिषा देवरे, दिनेश प्रल्हाद डोंगरे, कृष्णा हिंमत पाटील, नीरज संजय कानडे, रुपेश रामकीशन कौटकर, निलेश देवरे, अनन्या भारत इंगोले, विजय नरसिंह भवरे, वृषाली जाधव, धोंडिबा गंगाराम गायकवाड, उदांत दुशांत निमकर, निधी निमकर, मिरासा नासर शेख, विनीत वासनिक, बाबूलाल काशीराम डहाके, पूर्वजा अजय तोडसाम, पल्लवी, सांची केळकर, उषा निमकर, आरती बालकिशन मोकळे
सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!
Tanaji
जवाब देंहटाएं