21) बीड ( Beed )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग एकविसावा दिनांक :- 15 मे 2023 वार - सोमवार
21) जिल्हा - बीड माहिती
◆ बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे.
◆ बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो.
◆ बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
◆ बीड जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.
◆ बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.
◆ बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर माजलगाव धरण बांधलेले आहे.
◆ गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे.
◆ तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे.
◆ माजलगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
◆ मराठीतील आद्य कवी मुकुंदराज यांची अंबाजोगाई येथे समाधी (स्मारक) आहे.
◆ अंबाजोगाई येथे योगेश्वरी माता मंदिर आहे.
◆ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे.
◆ बीड हे बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे.
◆ मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे.
◆ बीड हे सिताफळासाठी प्रसिद्ध आहे.
◆ माजलगाव तालुक्यातील मंजरथ हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
◆ बीड जिल्ह्यात छोटेवाडी नावचे एक छोटे गावं आहे.
◆ बीड जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी, पश्चिमेला अहमदनगर, उत्तरेला : जालना व औरंगाबाद आणि दक्षिणेला लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्याच्या सीमा लागतात.
◆ बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत, बीड, किल्ले धारूर, अंबेजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी
◆ शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ ला करण्यात आली.
◆ बीड जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद मतदारसंघ असून ११ पंचायत समित्या आहेत.
◆ बीड जिल्ह्यात एक लोकसभा व सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
◆ गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.
◆ ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक असून ते दोन्ही खरीप व रब्बी अशा हंगामांत घेतले जाते.
◆ नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत.
◆ परळी येथे महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र आहे.
◆ आंबेजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आहे.
◆ वडवणी हा तालुका प्रामुख्याने कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
◆ शिरूर (कासार) तालुक्यातील खालापुरी या गावाला पोलीसाचे गाव म्हणतात.
◆ संत भगवानबाबा यांचे समाधीस्थळ असलेले भगवानगड हे पवित्र तीर्थक्षेत्र शिरूरहुन 18 किमीवर आहे.
◆ संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान सावरगाव घाट हे पाटोदा तालुक्यात आहे.
◆ गेवराई तालुक्यात गोदावरीकाठी वसलेले राक्षसभुवन गाव आहे. इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे.
◆ आष्टी तालुक्यातील नागतळा येथील नागनाथ देवस्थान प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी नागनाथ देवस्थानची भव्य अशी यात्रा भरते.
◆ बीड जिल्ह्यात कपिलधार हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. येथे धबधब्याचे पडणारे पाणी जागेवरच गायब होते.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा ( मराठीत ) नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक
दिनेश प्रल्हाद डोंगरे, संजय भारत गोडे, निलेश देवरे, एकनाथ रमेश पोतदार, एच. डब्ल्यू इखार, अनन्या भारत इंगोले, पल्लवी, विजय नरसिंह भवरे, श्रीनाथ रमेश पोतदार, निधी निमकर, उषा निमकर, कृष्णा हिंमत पाटील, बाबूलाल काशीराम डहाके, दत्ताहरी एकनाथराव कदम, उदांत दुशांत निमकर,विनीत वासनिक, साईनाथ कल्याणकर, पूर्वजा अजय तोडसाम
सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें