22) बुलढाणा ( Buldhana )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग बाविसावा दिनांक :- 16 मे 2023 वार - मंगळवार

22) जिल्हा - बुलढाणा माहिती

● बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. 

● जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे.

● बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुके आहेत - खामगांवचिखलीजळगाव जामोददेउळगांव राजानांदुराबुलढाणामलकापूरमेहकरमोताळालोणारशेगांवसंग्रामपूरसिंदखेड राजा


● कापूसज्वारीसोयाबीनसूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पीके आहेत.

  • शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
  • शेगाव येथील 'कचोरी' हा खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहे. 
  • शेगावला विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते
  • मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. 
  • लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
  • जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
  • नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध आहे. 
  • नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी 105 फूट उंचीची श्री हनुमान मूर्ती आहे.
  • खामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. 
  • देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव राजास प्रति तिरुपती सुद्धा म्हटले जाते. 
  • लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे.
  • लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबांचे मंदिर आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे.
  • मोताळा तालुक्यातील तारापूर येथील अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
  • सुलतानपूर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
  • उंद्री या गावापासून काही अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
  • अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळदेवी मंदिर आहे.
  • मेहकर येथे आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकाचे श्रद्धास्थान शारंगधर बालाजी देवस्थान आहे.
  • मेहकर पासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या उकळी येथे जगदंबा माता देवस्थान , श्री सिद्धेश्वर संस्थान आहे
  • लोणार पासून 18 कि मी अंतरावर श्री खटकेश्वर महाराज मंदिर ब्राम्हण चिकना या ठिकाणी आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे, तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. 

● श्री क्षेत्र थळ ता.मोताळा श्री गजानन महाराज जन्म स्थान प्रतिष्ठान

● बुलढाणा शहरापासून जवळच 18 किमी दुर असलेले दुधा येथील प्रसिद्ध मर्डदी माता मंदिर आहे हे मंदिर जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे आहे


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

बुलडाणा जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक

दिनेश प्रल्हाद डोंगरे, निलेश देवरे, श्रीनाथ रमेश पोतदार, एकनाथ रमेश पोतदार, दत्ताहरी एकनाथराव कदम,  संजय भारत गोडे, एच. डब्ल्यू इखार, श्रेया जोतीराम मस्के, रुपेश रामकीशन कौटकर, निधी निमकर, विजय नरसिंह भवरे, जयश्री खांडेभरड, बाबूलाल काशीराम डहाके, तेजश्री भांडवलकर, उदांत दुशांत निमकर, विनोद भाऊराव राजगुरू, उषा निमकर, पूर्वजा अजय तोडसाम, सुरज संजय विभूते, विनीत वासनिक

सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )