23) भंडारा ( Bhandara )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग तेविसावा दिनांक :- 17 मे 2023 वार - बुधवार

23) जिल्हा - भंडारा माहिती

◆ भंडारा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. 

◆ भंडारा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे.

◆ भंडारा जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत.

◆ भंडारा जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर (८०० फूट) आहे.

◆ भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. 

◆ भंडारा जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात आहे.

◆ तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत.

◆ भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

◆ वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही.

◆ या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ , गोसे धरण, कवलेवडा धरण, ही धरणे आहेत.

● इंदिरासागर धरणाची स्थापना गोसे खुर्द प्रकल्प म्हणून झाली. 

◆ 1960 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सिंचन प्रकल्पाचा भाग म्हणून रावणवाडी धरण बांधण्यात आले.

◆ उमरेड - करंडला येथे वन्यजीवन अभयारण्य आहे. 

◆ नोर्गालिंग तिबेटन हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक जिल्ह्यातील नोर्गेलिंग येथे राहतात.

◆ 2013 मध्ये कोका वन्यजीवन अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली. कोकामध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या जास्त आहे.

◆ भंडारा जिल्ह्यात सात तालुके आहेत - भंडारासाकोलीतुमसरपवनीमोहाडीलाखनीलाखांदूर

◆ तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे.

◆ भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराचे भूषण असलेला तुमसरेश्वर महागणपती दगडूशेठ गणपती पुणे येथील पूर्णाकृती आहे

◆ मोहाडी तालुक्यात सर्वात जास्त रेतीघाट आहेत 

वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

भंडारा जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक


श्रीनाथ रमेश पोतदार, एकनाथ रमेश पोतदार, विजय नरसिंह भवरे, संजय भारत गोडे, रुपेश रामकीशन कौटकर, निलेश देवरे, बालाजी साहेबराव रेनीवाड, विनायक बारदवार, एच. डब्ल्यू इखार, जयश्री खांडेभरड, पुंडलिक आढाव, बाबूलाल काशीराम डहाके, ऐश्वर्या इडेवार, अनन्या भारत इंगोले, शुभांगी करे, प्रचिती राधाजी कवटकर, आरती बालकिशन मोकळे, वैभवी बालाजी महाजन, निधी निमकर, विनीत वासनिक, उदांत दुशांत निमकर, तेजश्री शिवाजी भांडवलकर, पूर्वजा अजय तोडसाम

सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )