24) मुंबई उपनगर ( Munbai Upnagar )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग चोविसावा दिनांक :- 18 मे 2023 वार - गुरूवार
24) जिल्हा - मुंबई उपनगर माहिती
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे.
मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो.
मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून त्यातील लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे.
ह्या जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी. आहे.
हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे.
मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे - जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.
या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते.
महाकाली लेणी - पश्चिम रेल्वेवर अंधेरी रेल्वे स्थानकापासून 6 कि.मी. अंतरावरील लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहे. बुद्ध काळात हे अभयारण्य एक प्रमुख धार्मिक केंद्र असले पाहिजे. गुहेत 19 विहारांचा समावेश आहे. शिव अनुयायांनी नंतर शिवालंगमची शिल्पं स्थापीत केली आहे.
मुंबईमध्ये जुहु चौपाटी हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.
कन्हेरी गुंफा - या ठिकाणी 109 बौध्द विहार असून या विहारातून साधना करण्याऱ्या भिक्षूसांठी भूमिगत पाण्याचे साठे खोदण्यात आले आहे. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दांची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाशिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
मुंबई चित्रनगरी - भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे. भारतातील मुंबईत गोरेगांव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे.यामध्ये काही ध्वनिमुद्नन कक्ष, बागबगीचे, तलाव, चित्रपटगृह, मैदान इ.चा समावेश असून याचा बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला आहे. चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे. भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री. दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे.
आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष यामुळे हे उद्यान जिवंत दिसते. या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - या उद्यानाला पूर्वी कृष्ण गिरी उपवन असे संबोधिले जात असे. राष्ट्रीय उद्यान हे 104 चौ.कि.मी. क्षेत्रफळ विशाल परिसरात पसरलेले आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेला सुमारे 1 कि.मी. अंतरावर असून अतिशय विस्तीर्ण उद्यान तयार करण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला अगदी लागून असलेल्या या उद्यानात गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्य प्राणी, बागबगिचे आणि हिरवळ अशी निसर्ग सौंदर्याची रेलचेल आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
मुंबई उपनगर जिल्हा प्रश्नमंजुषा
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें