26) यवतमाळ ( yavatmal )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग सव्वीसावा दिनांक :- 20 मे 2023 वार - शनिवार
26) जिल्हा - यवतमाळ माहिती
◆ यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे.
◆ यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे.
◆ सन 1905 साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
◆ यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर दिशेस वर्धा व अमरावती जिल्हा, पूर्व दिशेला चंद्रपूर जिल्हा, दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य आणि पश्चिम दिशेला - हिंगोली व वाशिम जिल्हा आहे.
◆ या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत.
◆ यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा आहे.
◆ बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
◆ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते
◆ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे.
◆ जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो.
◆ जिल्ह्यात आंध, गोंड, परधान, टोकरे, कोळी आणि कोलाम आणि काही प्रमुख आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत.
◆ येथे मराठी हिंदी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात.
◆ यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरण, अरूणावती धरण, पूस धरण ही प्रमुख धरणे आहेत.
◆ यापैकी पैनगंगा नदीवरील बेंबळा धरण हे सर्वात मोठे आहे
◆ मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण हे प्रसिद्ध आहे, सायखेडा धरण, यवतमाळ येथील, बोरगाव धरण, निळोणा धरण येथे निसर्गमय वातावरण आहे व तेथे असंख्य पर्यटक भेट देत असतात
◆ जिल्ह्यात हातविणकाम (हॅंडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.
◆ यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके - कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर डाळ ही आहेत.
◆ जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो.
◆ जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे.
◆ येथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात.
◆ यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार-केंद्रे आहेत.
◆ चांदले शिलाई मशीन हे उमरखेड तालुक्यातील शिलाई मशीनचे अधिकृत व्यापार केंद्रे आहेत
◆ आर्णी येथील बाबा कंबल्पोष जत्रा(सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान मानले जाते), घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी)
◆ वणी तालुक्यातील शिरपूर या गावात प्राचीन शिव मंदिर व गोंडराजा यांची राजधानी असलेलं प्राचीन किल्ला आहे.
◆ महाशिवरात्रीला शिरपूर गावात शिव मंदिर असल्यामुळे भव्य अशी यात्रा भरते.
◆ वणी तालुक्यातील वरझडी हे गाव आहे त्याला लागून जंगले आहे व त्या जंगलामध्ये जगदंबा मातेचे निसर्गमय वातावरणात प्राचीन मंदिर आहे
◆ इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी पर्यटनस्थळे येथे आहेत आणि पांढरकवडा येेथिल जगदंबा देवी संंस्थान केलापूर ही आहेेेत.
◆ भवानी टेकडी-दिग्रस,वाघाडी नदीवरील-निळोना, चापडोह, पिंगळाई देवी नाथशक्तीपिठ करळगाव घाट [यवतमाळ] उमरखेड तालुक्यातील अबोना तलाव दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा या गावी 190 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वाघामाय देवी व महालक्ष्मी देवी चे भव्य मंदिर आहे व जंगले व वने लागून हे गाव आहे गावापासून 2 किमी अंतरावर जंगलामध्ये मूळ देवस्थान आहे.
◆ आसेगाव देवी ता.बाभुळगाव येथील जगदंबा माता मंदिर हे अतिशय प्राचीन असून ई.स.1670 पासूनचे हे प्राचीन मंदिर आहे. येथे नवरात्र व चैत्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो
◆ यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहेत - आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, झरी जामणी, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागांव, मारेगांव, राळेगांव, वणी, यवतमाळ
◆ यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे धरण आहे.
◆ वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले.
◆ टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे.
◆ सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो.
◆ यवतमाळ म्हणून ओळखले जाण्यापूर्वी, शहराला यवतेचा महाल आणि योत-लोहार असेही संबोधले जात असे.
◆ पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला पैनगंगा नदीचे नाव देण्यात आले आहे जे त्याच्या चारपैकी तीन बाजूंनी वेढलेले आहे. हे यवतमाळ शहराच्या उमरखेड तालुक्यात वसलेले आहे.
◆ टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे सागवान लाकडाचे माहेरघर आहे.
◆ विदर्भातील अष्टगणेश गणपतींपैकी एक, कळंब येथील श्री चिंतामणी, मंदिर भूमिगत अद्वितीय आहे.
◆ आर्णी हे अरुणावती नदीच्या काठी वसलेले गाव आहे,
◆ आर्णी येथे बाबा कंबल्पोष दर्गा शरीफ अरुणावती नदीच्या काठावर वसलेला आहे.
◆ आंध्र-महाराष्ट्र सीमेवर केळापूर येथे श्री. जगदंबा देवी मंदिर आहे. हे एक अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. आंध्रप्रदेश, विदर्भ विभागातून प्रचंड भक्त नियमितपणे येथे येतात.
◆ यवतमाळ शहरात जगत मंदिर आणि खोजा मशिद आहे.
◆ घाटंजी शहर “Cotton City” या नावाने सुद्धा ओळखले जाते.
◆ पुसद या शहराचे प्राचीन नाव पुष्पावंती नगरी असे होते.
◆ पुस ही नदी पुसद शहरातून वाहते.
◆ लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते.
◆ स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथे झाला होता.
◆ महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते.
◆ पुसद या शहराला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणतात.
◆ पुसद हा यवतमाळ जिल्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
◆ वणी तालुक्यात दगडी कोळसा व चुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.
◆ वणी शहर यवतमाळ जिल्हातील एकमेव (Yeotmal/Yavatmal) हे रेल्वे जंक्शन आहे.
◆ वणी शहरात विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर रंगनाथस्वामी मंदिर या नावाने ओळखले जाते.
◆ या मंदिराची विशेषता म्हणजे इथे शेषशय्येवर आडवे पहुडलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आढळते, जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, असे म्हटले जाते.
◆ वणी शहरात जैताई मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन देवळेसुद्धा आहेत.
◆ वणी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी (Black Diamond City) असे लिहिलेले आढळते. त्यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे, असे कळते.
◆ वणी जवळील नांदेपेरा हे गाव प्रसिद्ध मराठी साहित्यिक दिवंगत राम शेवाळकर यांचे मूळ गाव आहे.
◆ लोकनायक बापूजी अणे यांचे सुद्धा जन्मस्थान वणी हेच होय.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें