15) नांदेड ( Nanded )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग पंधरावा दिनांक :- 09 मे 2023 वार - मंगळवार

15) जिल्हा - नांदेड माहिती

◆ नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस आहे.

◆ या जिल्ह्याच्या पूर्वेस तेलंगणा राज्याचे आदिलाबाद व आग्नेयेस निझामाबाद हे जिल्हे असून दक्षिणेस कर्नाटक राज्याचा बीदर जिल्हा आणि आग्नेयेस व पश्चिमेस उस्मानाबाद, पश्चिमेस व वायव्येस परभणी व उत्तरेस यवतमाळ हे महाराष्ट्राचेच जिल्हे आहेत.

◆ नांदेडात शीखांचे शेवटचे गुरू गुरू गोविंदसिंहजी महाराज यांची समाधी सचखंड गुरुद्वारा या नावाने प्रसिद्ध आहे. 

◆ शीख बांधवांसाठी नांदेड हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.


◆ नांदेड हे संतकवी विष्णूपंत, रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. 

◆ नांदेड येथे श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

◆ नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर (नाभीस्थळी) वसलेले आहे.

◆ जिल्ह्यात मुख्यतः मराठी, उर्दू, तेलुगू, कानडी या भाषेसह बंजारी बोलीभाषा बोलली जाते.

◆ जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. 

◆ तसेच दत्तात्रेय, माता अनसूया आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक रामगड (माहूर) किल्ला आहे.

◆ कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला, हजार वर्षापूर्वी बांधलेला "जगतूंग सागर" साठवण तलाव आहे. त्याठिकाणी दोन दर्गाही आहेत. दरवर्षी कंधारचा 'उरुस' या नावाने फार जत्रा भरते. 

◆ लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी दक्षिण भारतातील फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. 

◆ बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. 

◆ देगलूर तालुक्यातील होट्टल येथील सिद्धेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे, तसेच धुंडा महाराज देगलूरकराची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिद्ध आहे. 

◆ नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे.

◆ किनवट तालुक्यातील उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. 

◆ पैनगंगा नदीच्या तीरावर छान असे किनवट तालुक्यातील टीटवाळा पक्षी अभयारण्य आहे. 

◆ नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा आणि १ लोकसभा मतदार संघ आहे.

◆ नांदेड येथे एकमेव नांदेड-वाघाळा महानगरपालिका आहे.

◆ नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. 

◆ नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. 

◆ नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरीमांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा

◆ कापूस व ज्वारी ही नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पीके असून काही भागात केळीचे उत्पादन घेतले जाते.

◆ नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.

◆ नांदेड येथील रेल्वे स्थानक असून त्याचे नाव तख्त श्री हुजूरसाहिब सचखंड नांदेड असे आहे. 

◆ नांदेड शहरात श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळ देखील आहे.

◆ नांदेडजवळ श्री शंकरराव चव्हाण विष्णुपुरी उपसा जलसिंचन असून हा राज्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे.

◆ केंद्र शासनाने नांदेड जिल्ह्यातील ‘कोलाम’ ही जमात ‘अतिमागास’ म्हणून घोषित केली आहे.

◆ नांदेड जिल्ह्यात 12 नगरपालिका असून 4 नगरपंचायत आहेत.

◆ कै. नरहर कुरुंदकर, कै. शंकरराव चव्हाण, कै. केशवराव धोंडगे असे प्रसिद्ध व्यक्ती या नांदेड जिल्ह्यातील होते.

◆ नांदेड जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत - अर्धापूरभोकरबिलोलीदेगलूरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकिनवटलोहामाहूरमुदखेडमुखेडनांदेडनायगावउमरी

◆ १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.

◆ या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे हे होते. 

◆ या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्याचे आहे. विद्यापीठ कक्षेत सध्या १८२ महाविद्यालये कार्यरत आहेत.

◆ किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामख्याने सागाची व बांबूची वने आढळतात.

◆ उमरी तालुक्यात गोरठा येथे साईबाबाचे परमभक्त संत दासगणू महाराज यांचा मठ आहे. 

◆ नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद हे शहर लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे.

◆ बहुचर्चित बाभळी बंधारा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात आहे. 

◆ मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF ) प्रशिक्षण केंद्र आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

नांदेड जिल्हा प्रश्नमंजुषा


10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE


हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

34) सिंधुदुर्ग ( Sindhudurg )

01) अकोला ( Akola )

04) छ. संभाजीनगर