34) सिंधुदुर्ग ( Sindhudurg )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग चौतीसावा दिनांक :- 28 मे 2023 वार - रविवार
34) जिल्हा - सिंधुदुर्ग माहिती
● राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे.
● सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे.
● सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
● पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.
● सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
● सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 01 मे 1981 साली झाली.
● सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले.
● शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे.
● १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला
● सिंधुदुर्गच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेला कोल्हापूर जिल्हा, दक्षिण दिशेस गोवा राज्य तर उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे.
● सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुके आहेत - कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी आणि सावंतवाडी
● सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रातील एक बेट आहे.
● सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भरपूर मासेमारी होते.
● शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारा सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील दुसरा जिल्हा आहे.
● कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तऱ्हेऱ्हेची रानफुले आढळतात.
● समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे.
● देवगडचा हापूस आंबा जगात प्रसिद्ध आहे.
● या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य आहार म्हणजे तांदूळ आणि मासे.
● देवगड तालुक्यात विजयदुर्ग नावाचा दुसरा किल्ला आहे.
● सावंतवाडी हे सुन्दरवाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
● सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.
● येथे लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात.
● सावंतवाडीचा रॉयल पॅलेस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
● आंबोली ता. सावंतवाडी जंगलात भरपूर जैवविविधता आढळते. तसेच धबधबे हे आंबोलीतील मुख्य आकर्षण आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.
● सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास “मोती तलाव” असे नाव पडले.
● सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्कुबा डायव्हिंग सागरी विश्व आहे.
● कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते.
● माणगाव येथे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे.
● रेडीचा गणेश येथे स्वयंभू गणेश मूर्ती असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्नमंजुषा
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें