04) छ. संभाजीनगर

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग चौथा दिनांक :- 27 एप्रिल 2023 वार - गुरूवार

04) जिल्हा - छत्रपती संभाजीनगर माहिती

★ छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे.

★ जिल्ह्यातील मुख्य शहर असून येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. 

★ फेब्रुवारी २०२३ मध्ये 'औरंगाबाद' या शहराचे व जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले.


★ जगप्रसिद्ध अजिंठा लेणीवेरूळ लेणीबीबी का मकबरा, पानचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. 

★ हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळची लेणी) आहेत. 

★ जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

★ मुहम्मद तुघलंकानी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगजेबांचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.

★ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे. 

★ शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे.

★ जिल्ह्यातील प्रमुख पीके - कापूसबाजरीमकातूरमूगज्वारीगहू ही आहेत. 

★ जिल्ह्यातील प्रमुख नद्या - गोदावरीतापीपूर्णा ह्या आहेत.

★ औरंगाबाद जिल्ह्यातील ८ टेकड्या - म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी ह्या आहेत.

★ पैठण हे संत एकनाथ यांची समाधी स्थळ आहे तसेच येथे संत ज्ञानेश्वर उद्यान आहे.

★ वेरूळ लेण्याजवळील घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. 

★ जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण असून त्यास नाथसागर असे ही म्हटले जाते.  हे धरण मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

★ दौलताबाद (जुने नाव देवगिरी) हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.

★ छत्रपती संभाजीनगर शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. 

★ शहराचे जुने नाव खडकी होते.

★ कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू शाल नावाच्या वस्त्रप्रकारासाठी छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते.

★ चिखलठाणा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 

★ छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ.

★ खुलताबाद येथे औरंगजेब यांची कबर आहे तसेच भद्रा मारोतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

★ सोयगाव तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटन स्थळ आहे.

★ गंगापूर तालुक्यातील लासूर येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण भागातील बाजारपेठ आहे. 

★ कन्नड शहराला आज कन्नड नावाने ओळखले जाते मात्र जुने लोक या शहराचे नाव कनकावती होते असे सांगतात. 


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER

10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER

10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST

10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE


हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,

नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769

धन्यवाद ..........! 


या प्रश्नमंजुषा स्पर्धेत 10 पैकी 10 अचूक उत्तर देणारे वाचक


अश्विनी, उत्तपम,  

विष्णू गोपीनाथ पाटील, 

अथर्व कुलदीप लोमटे, 

प्रज्वल पाझडे, 

स्वप्नील दाणे,  

साईनाथ कल्याणकार, 

ऐश्वर्या इडेवार, 

धनश्री राजेंद्र आंबटवार, 

रुपेश रामकीशन कौटकर, 

संपदा पिवल, एम जे,  Unkonwn नाव


सर्वांचे मनस्वी अभिनंदन .......!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )