27) रत्नागिरी ( Ratnagiri )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग सत्ताविसावा दिनांक :- 21 मे 2023 वार - रविवार

27) जिल्हा - रत्नागिरी माहिती

● रत्नागिरी जिल्हा हा कोकण विभागात येतो.

● रत्‍नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे.

● रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. 

● या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

● हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता.

● हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. 

● दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. 

● सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली

● रत्‍नागिरी जिल्ह्यात 09 तालुके समाविष्ट आहेत - गुहागरखेडचिपळूणमंडणगडदापोलीरत्‍नागिरीराजापूरलांजासंगमेश्वर

● आंबडवे हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे एक पंचतीर्थ आहे


● गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. येथील समुद्रकिनारा लोकांना आकर्षित करते.

● गुहागर येथे .श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.

● वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प गुहागरला आहे.

● नारळपोफळीकोकम व आंब्याच्या बागा हे चिपळूण परिसरातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहेत.

● चिपळूण एक ऐतिहासिक शहर आहे.

● रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे परमपूज्य साने गुरुजी यांचा जन्म झाला

● निसर्गसंपन्न आणि सौंदर्य असलेला जयगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

● लांजा या अतिशय सुंदर गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.

● उन्हाळे येथे सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत.

● राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात.

● पावस गाव गौतमी नदीच्या काठावर वसले आहे. स्वामी स्वरूपानंद स्मृतीमंदिर ( समाधी ) आहे.

● पावस येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.

● सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे.

● संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे.

● रसाळगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

● महिपतगड हा सगंमेश्वर तलुक्यातील एक गड आहे.

● रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

●आंब्याप्रमाणेच काजूनारळफणसआमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. 

● तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते

● दापोली येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाची स्थापना १८ मे १९७२ मध्ये झाली.

● दाभोळ येथे एनरॉन प्रकल्प कार्यान्वित आहे.

● रत्‍नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो 

● रत्नागिरी जिल्ह्यात एक लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.

● 

रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - महर्षी धोंडो केशव कर्वेमहामहोपाध्याय पां वा. काणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकभागोजी कीर , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरअनंत लक्ष्मण कान्हेरे

● अंजनवेल हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावाने पण ओळखला जातो.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील नद्या -

काजळी, केव, गडबोरमुचकुंदीवाशिष्टीशास्त्रीसावित्रीजगबुडी ई.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


रत्नागिरी जिल्हा प्रश्नमंजुषा


10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

03) अहिल्यानगर ( Ahilyanagar )

10) जळगाव