28) रायगड ( Raigad )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग अठ्ठाविसावा दिनांक :- 22 मे 2023 वार - सोमवार

28) जिल्हा - रायगड माहिती

◆ रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. 

◆ बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

◆ अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

◆ रायगड जिल्ह्याचे शेजार

चे जिल्हे मुंबई, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, आग्नेयेस सातारा जिल्हा, दक्षिणेस रत्‍नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र आहे.

◆ 1869 मध्ये ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर पनवेल आहे. 

◆ या जिल्ह्यात प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी असलेल्या उरणमध्ये असलेल्या घारापुरी किंवा एलिफंटा बेटाचाही समावेश आहे.

◆ रायगड जिल्ह्यात 15 तालुके आहेत - पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूर आणि तळा

◆ पनवेल शहरात धूतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधांचा भारतातील पहिला कारखाना आहे.

◆ माथेरान हे एक ८०० मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे.

◆ खोपोली हे खालापूर तालुक्यातील महत्त्वाचे शहर आहे, येथे टाटा पावर कंपनीचे जलविद्युत निर्माण केंद्र आहे.

◆ रोहा निसर्ग संपन्न तालुका असून भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे.

◆ ऐतिहासिक चवदारतळे हे रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आहे.

◆ वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर महाड येथे आहे.

◆ रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे.

◆ छ. शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी  वापरले जाणारे ठिकाण म्हणजे टकमकटोक, गुन्हेगाराला पोत्यात भरून टोकावरून ढकलून दिले जात असे ठिकाण म्हणून हे इतिहासात प्रसिद्ध आहे.


◆ रायगड मधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे राजभवन हे ठिकाण आहे,  जिथून छ. शिवाजी महाराजांनी आपले राज्य चालवले.

◆ नारळाची झाडे, हिरवी पाने आणि रानफुलांनी भरलेला, किहिम बीच महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे

◆ दिवेआगर बीच निसर्ग प्रेमींसाठी रायगड पिकनिक स्पॉट्सपैकी एक आहे

◆ अलिबाग समुद्रकिनारा हा मुख्य समुद्रकिनारा आहे. सपाट आणि लांबी हे या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ठ आहे.

◆ खालापूरजवळ धाई नदीवर बांधलेले, मोरबे धरण हे माळशेजमध्ये आहे.

◆ इतिहास प्रेमींसाठी रायगडमधील आवर्जून भेट देण्याजोगे पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे राणी महाल.

◆ रायगड संग्रहालयात छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीपासून इतिहासाचे दालन अचूकपणे जतन केले आहे.

◆ तळा तालुक्यातील पन्हेळी येथील गायमुख हे तीर्थक्षेत्र व महाराष्ट्र राज्य पर्यटन ठिकाण आहे. जिथे गायीच्या मुखातून वर्षभर थंड पाणी येत असतो.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  


खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

ररायगड जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

10) जळगाव

15) नांदेड ( Nanded )