Feed Back
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी
या उपक्रमाची सुरुवात दिनांक 24 एप्रिलपासून झाली. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हसत खेळत उपयुक्त अशी माहिती मिळावी या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यातील आणि देशातील घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांची विशेष अशी माहिती इंटरनेट आणि विविध माध्यमातून संकलन करण्यात येत आहे आणि त्या माहितीवर आधारित 10 प्रश्नांची प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे.
दररोज सकाळी 07 वाजता whatsapp आणि facebook या सोशल मिडियाद्वारे सर्व वाचकांना पाठविण्यात येत आहे. यास राज्यातील व पर राज्यातील वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल वाचकांचे मनस्वी आभार. माझ्या पुढील उपक्रमासाठी आपले अभिप्राय प्रेरणा देतील म्हणून हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील गुगल फॉर्मवर जरूर कळवावे.
https://surveyheart.com/form/646b204a4b5a0e53ef67b06c
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें