02) आसाम ( asam )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य 
भाग दुसरा दिनांक :- 02 जून 2023 वार - शुक्रवार

02) राज्य - आसाम माहिती

◆ आसामच्या उत्तरेला भूतान व अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालँड व मणिपूर ही राज्य आहेत. तर दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा व मिझोरम ही राज्य आहेत. 

◆ ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. 

◆ आसामची लोकसंख्या ३,११,६९,२७२ एवढी आहे. 

◆ असमिया ही आसामची प्रमुख भाषा आहे. 

◆ आसामची साक्षरता ७३.१८ टक्के एवढी आहे. 

◆ चहा, तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत. 

◆ बिहू नृत्य आसामचा लोकप्रिय नृत्य आहे. 

◆ दिसपूर ही आसामची राजधानी आहे 

◆ आसाम राज्यातील गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे.

◆ आसाम राज्यात 23 जिल्हे आहेत.

◆ आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंडे ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.

◆ भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या वाघांचे घर मानस राष्ट्रीय उद्यान येथे आहे.

◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले काकोचांग धबधबा पाहण्यासारखे ठिकाण आहे.

◆ टोकलाई टी रिसर्च सेंटर हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने चहा संशोधन केंद्र आहे, ज्याची स्थापना 1911 मध्ये झाली आहे. 

◆ आसाम राज्य प्राणीसंग्रहालय हेंगराबारी राखीव जंगलात खोलवर आहे. येथे विविध प्रजातीच्या पशु-पक्षी बघायला मिळतात. 

◆ जगातील सर्वात लहान बेटांपैकी एक उमानंद बेट आहे. ज्याला ब्रिटीशांनी पीकॉक आयलंड देखील म्हटले होते. हे प्रसिद्ध उमानंद मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे.

◆ गुवाहाटी येथे अंतराळ संशोधन आणि अवकाशप्रेमींना गुवाहाटी तारांगण मोठ्या संख्येने आकर्षित करते.

◆ तेजपुर हे आसामचे सांस्कृतिक केंद्र आहे.

◆ आसाममधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक - नामेरी राष्ट्रीय उद्यान

◆ पदम पुखुरी हे एक बेट उद्यान आहे जे त्याच्या कमळांसाठी प्रसिद्ध आहे, तर हजारा पुखुरी हे तेजपूरमधील तिसऱ्या क्रमांकाचे मानवनिर्मित तलाव म्हणून ओळखले जाते.

◆ आसाम मध्ये जॉयसागर, गौरीसागर आणि रुद्रसागर हे मानवनिर्मित सर्वात मोठे तलाव आहेत.

◆ सिलचर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे आणि बराक नदीच्या काठी वसलेले आसाममधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

◆ विणकरांचे गाव म्हणून ओळखले जाणारे सुळकुची हे राज्यातील सर्वोत्तम रेशीम बनवते. याच कारणासाठी त्याला पूर्वेचे मँचेस्टर असे संबोधले जाते. 

◆ कामाख्या मंदिर हे आसाममधील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर गुवाहाटी शहरात निलाचल टेकडीवर वसलेले आहे.
◆ आसाम हे चहा उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य आहे.

वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

आसाम राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE


हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )