04) उत्तरप्रदेश ( Uttarpradesh )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग दुसरा दिनांक :- 04 जून 2023 वार - रविवार
04) राज्य - उत्तरप्रदेश माहिती
◆ लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते.
◆ उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे.
◆ हिंदी व उर्दू ह्या उत्तरप्रदेशातील प्रमुख भाषा आहेत.
◆ उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ आहे तर कानपुर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
◆ उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे.
◆ उत्तरप्रदेश मध्ये तांदूळ, गहू, मका व डाळ ही प्रमुख पिके आहेत.
◆ उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
◆ उत्तर प्रदेशात सर्व धर्माची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.
◆ उत्तरप्रदेशचे राज्य नृत्य कथ्थक आहे.
◆ उत्तरप्रदेशचा राज्य खेळ हॉकी आहे.
◆ उत्तरप्रदेश राज्यात एकूण 70 जिल्हे आहेत.
◆ आग्रा हे ताजमहाल या वास्तूसाठी जगप्रसिद्ध आहे.
◆ मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे.
◆ फिरोझाबाद येथे बांगड्या व काचसामानाचे उद्योग आहेत.
◆ सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेले मुस्लिम विद्यापीठ अलिगढ येथे आहे.
◆ उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी हे एक प्रमुख शहर आहे.
◆ काशी म्हणजे वाराणसी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे.
◆ वाराणसी येथे काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
◆ वाराणसी हे शहर गंगा नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे.
◆ काशीमध्ये गंगाकिनारी बांधलेले एकूण ८८ घाट आहेत.
◆ वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे.
◆ काशी शहराला मंदिराचे शहर देखील म्हटले जाते.
◆ वाराणसी येथे भारतातले पहिले शासकीय संस्कृत कॉलेज 1791 साली स्थापन झाले.
◆ अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले.
◆ कानपुर हे उत्तरप्रदेशातील सर्वात मोठे तर भारत देशातील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
◆ कानपुर येथे ग्रीनपार्क स्टेडियम आहे.
◆ १८५७ चा उठाव उत्तरप्रदेशातीळ मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले.
◆ गोरखपूर प्रामुख्याने येथील गोरखनाथ मठासाठी ओळखले जाते.
◆ श्रीरामाचे जन्मस्थान असलेलं अयोध्या फैझाबादच्या जवळ स्थित आहे.
◆ झाशी हे बुंदेलखंडचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते, तसेच राणी लक्ष्मीबाई मुळे इतिहासात प्रसिद्ध झाले.
◆ नोएडा हे दिल्लीचे उपगृह शहर आहे आणि ते भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा (NCR) एक भाग आहे.
◆ मुझफ्फरनगर हे आशियातील सर्वात मोठे गुळाचे मार्केट मानले जाते.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
उत्तरप्रदेश राज्य प्रश्नमंजुषा
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें