07) कर्नाटक ( Karnatak )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग सातवा दिनांक :- 07 जून 2023 वार - बुधवार
07) राज्य - कर्नाटक माहिती
● कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली
● १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.
● कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू आहे. ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.
● कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात.
● राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे.
● कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे.
● कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत.
● कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.
● म्हैसूर राज्याचा सेनापती हैदर अली त्याचा मुलगा टिपू सुलतान हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धा मानला जातो.
● कित्तुर चिन्नमा ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.
● कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. किनारपट्टी लगतचा कोकण अथवा करावली. सह्याद्रीने व्यापलेला मलेनाडू, व दख्खनच्या पठाराचा बयलूसीमे.
● राज्याचा बहुतांशी भाग बयलूसीमेत मोडतो. त्यातील उत्तरेकडच्या भागाचा अंतर्भाव भारताच्या कोरड्या प्रदेशांमध्ये होतो.
● कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मलयनगिरी. त्याची उंची १,९२९ मीटर (६,३२९ फूट) इतकी आहे.
● कावेरी कृष्णा, मलप्रभा, तुंगभद्रा व शरावती ह्या राज्यातल्या प्रमुख नद्या आहेत.
● कर्नाटकात चार प्रमुख ऋतू आहेत. सौम्य हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी), उन्हाळा (मार्च ते मे), पावसाळा (जून ते सप्टेंबर) व उत्तर पावसाळा (ऑक्टोबर ते डिसेंबर).
● अगुंबे हे कर्नाटकातले सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.
● कर्नाटकाचा पूर्व भाग अतिशय शुष्क आहे. रायचूर येथे सर्वाधिक ४५.६° सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यातील सर्वात कमी तापमान बिदर २.८° सेल्सियस येथे नोंदवले गेले आहे.
● कर्नाटक हे एक सांस्कृतिक वारसा असलेल राज्य आहे
● कर्नाटकची २२% टक्के जमीन ही जंगलांनी व्यापली आहे. बहुतांश जंगल किनारपट्टी व सह्याद्रीच्या क्षेत्रात येते.
● म्हैसूर शहराच्या दक्षिणेला एक मोठे जंगल आहे. त्याची गणना भारतातल्या मोठ्या जंगलक्षेत्रांत होते.
● कर्नाटक आर्थिक बाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर महाराष्ट्र व गुजरात आहेत.
● सॉफ्टवेर क्षेत्रातील प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.
● भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे.
● देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटकमध्ये आहेत.
● कॅनरा बँक, सिंडीकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मुळच्या कर्नाटकमधील आहेत.
● उडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांत भारताच्या बँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे.
● रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताच्या एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो.
● विधानसभेच्या एकूण २२४ आमदार निवडले जातात तर विधान परिषदेत ७५ आमदार निवडले जातात.
● बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे.
● मंगळूर, हुबळी, बेळगाव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे.
● भारताच्या खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एर डेक्कन ह्या बेंगलोर मधल्या कंपन्या आहेत
● कर्नाटकात एकूण ११ बंदरे आहेत. मेंगलोर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.
● कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था आहे.
● पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो.
● राज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत कुद्रेमुख, मडिकेरी आणि अगुंबे यांसारखी सृष्टीसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत व थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत.
● कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत.
● बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत.
● नागरहोळ राष्ट्रीय उद्यान याचे नवीन नाव राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान करण्यात आले आहे.
● हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष, आद्य शंकराचार्य संबंधित मठ आहे व पट्टडकल येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.
● बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात.
● क्लोरिटिक खडक वापरून बांधलेली बेलूरची आणि हळेबीडची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत येण्याची शक्यता आहे.
● होयसळ येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
● शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली श्री होयसाळेश्वर आणि श्री केदारेश्वर मंदिरे हळेबीड येथे आहेत.
● विजापूर येथील गोलघुमट हा मध्ययुगीन स्थापत्यकाळात बांधलेला जगातील दुसरा सर्वात मोठा घुमट आहे. सर्वात मोठा घुमट इस्तंबूल मधील हागिया सोफिया येथे आहे.
● श्रवणबेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.
● जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारताच्या सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत.
● इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.
● म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे.
● म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
● म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा दसरा उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात.
● म्हैसूरची ओळ्ख ही इतर अनेक रूपाने प्रसिद्ध आहे जसे की म्हैसूर चित्रकला, म्हैसूर पाक, म्हैसूर मसाला डोसा, म्हैसूरचा चंदनाचा साबण, म्हैसूर शाई इ. म्हैसूरी फेटा (पारंपरिक रेशीम पगडी) आणि म्हैसूरला पारंपारिक रेशमी साडी उद्योगांच्या बरोबरीने पर्यटन हे प्रमुख उद्योग आहेत.
● म्हैसूर शहरात भारतातील पहिले खाजगी रेडिओ केंद्राची स्थापना झाली.
● म्हैसूर विद्यापीठात आजवर अनेक लक्षवेधक शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, कलाकार, गायक आणि क्रीडापटू तयार झालेत.
● क्रिकेट आणि लॉन टेनिस हे म्हैसूर शहरातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.
● उडुपीतील कृष्णाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
● कोडागु हा जिल्हा कर्नाटकातील सगळ्यात कमी वस्ती असलेला जिल्हा आहे.
● मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात. या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
● गुलबर्गा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गाणगापूर हे नरसिंह सरस्वती व दत्तात्रय मंदिरामुळे प्रसिद्धीस आले.
● गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि ख्वाजा बंदे नवाझ दर्गा प्रसिद्ध आहे.
● नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो.
● कारवार येथे भारतीय आरमाराचा मोठा तळ आहे.
● विजापूरचे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे.
● बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून यावर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा बोलल्या जातात.
● उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे.
● बिदर येथे श्री नृसिंह स्वामींचे मंदिर आहे तसेच शिखांच्या गुरुद्वारासाठी देखील प्रसिद्ध आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें