12) झारखंड ( Jharkhand )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग बारावा दिनांक :- 12 जून 2023 वार - सोमवार
12) राज्य - झारखंड माहिती
★ बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.
★ वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे.
★ रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे.
★ झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे.
★ या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे.
★ हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे.
★ तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.
★ जमशेदपूर हे झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
★ भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर जमशेदपूर होते.
★ प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली.
★ १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले.
★ आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
★ जमशेदपूर येथे टाटानगर रेल्वेस्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.
★ झारखंड राज्यात 24 जिल्हे आहेत.
★ झारखंड राज्यात 14 लोकसभा मतदारसंघ आहेत.
★ झारखंड राज्यात 82 विधानसभा मतदारसंघ आहेत.
★ सध्याचे भारताचे राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु हे झारखंडचे राज्यपाल होते.
★ लातेहार हा जिल्हा नक्षलवादी क्षेत्रात मोडतो.
★ कोडरमा हा सध्या रेड कॉरिडॉरचा एक भाग आहे.
★ कोडरमा जिल्हा नैसर्गिक संसाधनांनी संपन्न आहे.
★ रामगढ जिल्ह्यात राजरप्पा येथील छिन्नमस्ता देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
★ धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे भारताची कोळसा राजधानी असा खिताब धनबादला देण्यात येतो.
★ धनबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-गया-हावडा ह्या प्रमुख लोहमार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे १०० गाड्या थांबतात.
★ भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी सिमडेगा जिल्हा आहे.
★ हजारीबाग वन्यजीव अभयारण्य आणि बेटला राष्ट्रीय उद्यान ही या प्रदेशातील वन्यजीवांची सर्वात प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
★ कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट, युरेनियम, चुनखडी, डोलोमाईट, पायरोक्सेनाइट, क्वार्ट्ज आणि क्वार्टझाइट यांचे साठे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
★ रांची येथे विमानतळ आहे त्याचे नाव बिरसा मुंडा विमानतळ असे आहे.
★ बिरसा मुंडा (1875-1900) आणि सिधो व कान्हो हे या राज्यातील आदिवासींचे दिग्गज नायक आहेत ज्यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी शासनाविरुद्ध लढा दिला.
★ खनिजांच्या दृष्टिकोनातून झारखंड हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
★ इंडियन स्कूल ऑफ माईन्स (आता IIT धनबाद) ही प्रतिष्ठित संस्था धनबाद येथे आहे.
★ झारखंड राज्य कोळशाच्या साठ्यामध्ये पहिले स्थान, लोहामध्ये दुसरे स्थान, तांबे धातूच्या साठ्यात तिसरे स्थान, बॅक्सुइट राखीव मध्ये सातवे स्थान आणि प्राइम कोकिंग कोळशाचे एकमेव उत्पादक राज्य आहे.
★ झारखंडचा सर्वात मोठा जिल्हा पश्चिम सिंगबुम आहे.
★ झारखंड राज्याच्या उत्तरेला बिहार, पश्चिमेला उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड, दक्षिणेला ओडिशा आणि पूर्वेला पश्चिम बंगाल या राज्यांशी आहे.
★ रांची हा लोकसंख्येनुसार झारखंडमधील सर्वात मोठा जिल्हा आहे.
★ झारखंडमधील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा लोहरदगा आहे.
★ भारतातील पहिला पोलाद प्रकल्प जमशेदपूर येथे स्थापन झाला. 1907 मध्ये याची स्थापना जमशेदजी नुसरवानजी टाटा यांनी केली होती.
★ झारखंड राज्यात 32 आदिवासी गट आहेत ज्यांनी सर्व क्षेत्र व्यापले आहे. मुंडा आदिवासी गट ही भारतीय संविधानातील अनुसूचित जमातींतर्गत वर्गीकृत केलेली सर्वात मोठी जमात आहे.
★ बोकारो येथे जवाहरलाल नेहरू बायोलॉजिकल पार्क आहे.
★ बोकारो शहर द स्टील कैपिटल ऑफ़ इंडिया या नावाने ओळखले जाते.
★ देवघर येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे.
★ बेटला राष्ट्रीय उद्यान हत्ती साठी प्रसिद्ध आहे.
★ रांची येथे एक क्रिकेट स्टेडियम आहे.
★ भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची शहराशी संबंधित आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें