13) त्रिपुरा ( Tripura )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग तेरावा दिनांक :- 13 जून 2023 वार - मंगळवार
13) राज्य - त्रिपुरा माहिती
◆ त्रिपुरा हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.
◆ त्रिपुराच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत.
◆ त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे.
◆ आगरताळा हे त्रिपुराची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.
◆ त्रिपुरा राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे.
◆ तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत.
◆ राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे.
◆ गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत.
◆ येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात.
◆ बंगालीसोबत कबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे.
◆ मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे
◆ त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत.
◆ त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.
◆ त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे.
◆ अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.
◆ त्रिपुरा राज्यात 8 जिल्हे आहेत.
◆ उदयपूर हे ऐतिहासिक शहर गोमती जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
◆ गोमती जिल्ह्यामधील त्रिपुर सुंदरी हे षोडशी देवीचे मंदिर हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचे स्थान व ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.
◆ धर्मनगर हे त्रिपुरामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे.
◆ आगरताळा हे गुवाहाटी व इंफाळ खालोखाल ईशान्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
◆ आगरताळा येथे विमानतळ असून येथून एअर इंडिया आणि इंडिगो विमान कंपनी सेवा पुरवितात.
◆ कैलासहर हे त्रिपुरा राज्यातील मोठे शहर आहे, जे बांगलादेशच्या सीमेच्या जवळ आहे.
◆ कैलासहर येथील मुख्य पर्यटन स्थळे म्हणजे लाखी नारायण बारी आणि चौडो देवोतर मंदिर.
◆ कैलासहराभोवती अनेक चहाच्या बागा आहेत.
◆ आगरताळा येथील उज्जयंता पॅलेस हे महाराजा राधा किशोर माणिक्य यांनी 1899 मध्ये बांधलेले शाही घर होते.
◆ गोरा घरमेलाघर हे रुद्रसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या नीरमहाल सारख्या सुंदर इमारतीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
◆ उदयपूरला पूर्वी रंगमती म्हणून ओळखले जात असे, उदयपूर कृत्रिम तलावांसाठी प्रसिध्द आहे.
◆ नीरमहाल यास द लेक पॅलेस ऑफ त्रिपुरा किंवा जलमहल असे म्हणून देखील ओळखला जातो. तसेच फ्लोटिंग पॅलेस असेही म्हटले जाते
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें