16 ) नागालँड ( Nagaland )

रविवारची सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग सोळावा दिनांक :- 25 जून 2023 वार - रविवार

16) राज्य - नागालँड माहिती

• नागालॅंड हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. 

• नागालॅंड राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. 

• नागालॅंड राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. 

• नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. 

• कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. 

• ॲंगमी व चॅंग ह्या नागालॅंड येथील प्रमुख भाषा आहेत. 

• शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत.

• तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही नागालॅंड येथील प्रमुख पिके आहेत. 

• नागालॅंड या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.

• नागालॅंड राज्यात एकूण 15 जिल्हे आहेत. 

• दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ आहे. 

• दिमापूर येथे हिडिंबा नावाचा वाडा आहे. त्यात बुद्धिबळाच्या आकाराच्या सोंगट्या आहेत. रामायणातील भीमाची पत्नी हिडिंबा ही इथली राजकुमारी होती असे म्हणतात.त्यामुळे या शहरास हिडिंबानगरी असेही नाव आहे.

• कोहिमा हे दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे

• कोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे.

• नागालँडला ‘लँड ऑफ फेस्टिव्हल्स’ या टोपणनावानेही ओळखले जाते.

• उन्हाळ्यात कोहीमा येथील तपमान 26.4° से. च्या वर जात नाही.

• बोर्जन येथे एक कोळशाची खाण आहे.

• नागालँडच्या सुंदर दृश्यांमध्ये जुकू घाटी हे पर्यटनासाठीही खास ठिकाण आहे.

• कोहिमा शहराच्या बाहेरील भागात असलेले नागा हेरिटेज व्हिलेज म्हणून ओळखले जाणारे किसामा गाव हे नागालँडचे एक आकर्षण आहे.

• मोकोकचुंग आपल्या समृद्ध परंपरा, सण आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जाते.

• सोम ही कोन्याक नागांची भूमी आहे. नागालँडमध्ये सोम हे एक आकर्षक ठिकाण आहे कारण ते चेहऱ्यावर टॅटू गोंदवणाऱ्या, दात काळे करणाऱ्या आणि डोक्याची शिकार करणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. 


• फळबागांनी नटलेले, रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेले, नद्या आणि टेकड्यांनी नटलेले, वोखा ही नागालँडला निसर्गाने दिलेली अद्भूत देणगी आहे.

• झुकू व्हॅली पूर्णपणे विलोभनीय सौंदर्याने आशीर्वादित आहे. देशातील सर्वोत्कृष्ट ट्रेकिंग सर्किट म्हणून लोकप्रिय, भव्य डझुकू व्हॅली ट्रेकर्ससाठी आनंददायी आहे.

• मेलुरी मधील प्रमुख आकर्षणांपैकी एक मनोरंजक खडक रचना आहे. हे गाव डझुडू आणि शिल्लोई तलावांसाठी देखील ओळखले जाते. 

• किफिरे हे नागालँडमधील सर्वात उंच सरमतीच्या शिखराचे घर आहे. येथे अनेक धबधबे व गुहा आहेत.

• पेरेन ही कुकी आणि झेलियनग्रॉन्ग जमातींची भूमी आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

नागालँड राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )