07) गडचिरोली

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग सातवा दिनांक :- 30 एप्रिल 2023 वार - रविवार

07) जिल्हा - गडचिरोली माहिती

★ गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. 

★ तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. 

★ गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. 

★ हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. 

★ जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थक लोक आश्रय घेतात.

★ जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१2 चौ.कि.मी आहे.

★ हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.

★ गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. 

★ जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ६२ टक्के आहे.

★ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २० मे १९९२ रोजीला सर्वात जास्त ४६.३ अंश.से. एवढे व ५ जानेवारी १९९२ रोजी सर्वात कमी ५.० अंश से. एवढे तापमान नोंदले गेले आहे.

★ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो

★ अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. 

★ त्यांच्या बोलीभाषा "गोंडी, माडिया" ह्या आहेत. 

★ गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.

★ येथील आदिवासी लोकांचे "पेरसा पेन" हे दैवत आहे. 

★ ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर "रेला" नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. 

★ " ढोल " हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. 

★ होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. 

★ आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.

★ झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुका ठिकाण प्रसिद्ध आहे. 

★ येथील दंडारण्य नृत्य प्रसिद्ध आहे.

★ हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. 

★ भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. 

★ जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

★ जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना आहे.

★ जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. 

★ भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत.

★ जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे.

★ जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.

★ गडचिरोली जिल्ह्यात 12 तालुके आहेत.

★ गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा तर एक लोकसभा क्षेत्र आहे.

★ आरमोरी तालुक्यातल्या वैरागड येथे हिऱ्याच्या खाणी व देऊळगाव येथे लोहखनिजाचा साठा आहे.

★ कुरखेडा तालुक्यात बौद्ध समाजाचे स्थळ म्हणून तपोभूमी प्रसिद्ध आहे.

★ सिरोंचा येथे दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थाची यात्रा भरते.

★ गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना सैनिकी विद्यालय नावाचे एक सैनिकी विद्यालय आहे.
★ गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. 

★ कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किलोमीटर अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे.

★ चामोर्शी तालुक्यात माडेमुधोली परिसरातील 'कोठ्री' या गावालगत असलेल्या घनदाट व्यापलेल्या जंगलामध्ये "महामानव तथागत गौतम बुद्ध" यांचे [बौद्ध विहार] आहे. त्यास 'अरण्यवास बुद्ध विहार, नाला संगम कोठ्री, परिसर माडेमुधोली' या नावानेही ओळखले जाते

★ डॉ.अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था तेथील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवते. 

★ डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा, भामरागड) ही संस्थादेखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER

10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER

10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST

10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.

आपलाच,
नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )