01) अरुणाचल प्रदेश ( Arunachal Pradesh )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग पहिला दिनांक :- 01 जून 2023 वार - गुरूवार
01) राज्य- अरुणाचल प्रदेश माहिती
★ अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे.
★ हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.
★ या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.
★ अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर आहे.
★ अरुणाचल प्रदेशात एकूण 13 जिल्हे आहेत.
★ अरुणाचल प्रदेशात हिंदी आणि इंग्रजी भाषा सोबत मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा बोलली जाते.
★ अरुणाचल प्रदेशात 60 विधानसभा मतदार संघ आहेत.
★ आसाम राज्याचे विभाजन होऊन 1987 साली अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य स्थापन झाले
★ अरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत.
★ अरुणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे.
★ भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे.
★ अरुणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे.
★ या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते.
★ अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.
★ अपांग म्हणजे तांदळापासून तयार केलेले मद्य हे येथील पेय आहे. विविध चवींचे हे पेय या प्रदेशात लोकप्रिय आहे.
★ कामेंग, सुबनसिरी, सियांग अथवा दिहांग, दिबांग अथवा सिकांग, लोहित आणि बुरीदिहींग या ब्रह्मपुत्रेला मिळणाऱ्या या राज्यातील प्रमुख नद्या.
★ या नद्या तसेच लहानसहान नद्यानाले यांकाठची जमीन तेवढी सुपीक आहे. नद्यानाल्यांनी हिमालयामध्ये कित्येक घळी व खिंडी बनविल्या आहेत.
★ अशाच एका घळीतून तिवेटमध्ये पश्चिम-पूर्व वाहणारी त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) दक्षिणवाहिनी बनते तिला अरुणाचलमध्ये ‘दिहांग’ म्हणतात, तर लोहित नदीच्या संगमानंतर आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा नाव मिळाले आहे.
★ येथील लोकांचे मुख्य व्यवसाय हा शेती आणि जंगलावर आधारित उद्योगधंदे व शिकार, मच्छीमारी, विणकाम इ. उद्योगधंदे हा आहे.
★ भात, मका, नाचणी, रताळी ही येथील प्रमुख पिके होत.
★ येथे निकेल, कोबाल्ट, तांबे व गंधक यांचे साठे मोठ्या प्रमाणावर असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते अद्याप किफायतशीर नाहीत.
★ या लोकांची घरे बांबूची असतात.
★ बायकांना गोंदवून घेण्याची व दागिन्यांची हौस असते.
★ नयनरम्य पर्वत, बर्फाच्छादित धुके, प्रसिद्ध बौद्ध मठ, खिंड आणि निर्मळ तलाव मिळून अरुणाचल प्रदेशला एक सुंदर हिल स्टेशन बनवते.
★ भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी तवांग हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें