10) जळगाव

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग दहावा दिनांक :- 04 मे 2023 वार - गुरूवार

10) जिल्हा - जळगाव माहिती

● जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रात आहे आणि प्रशासकीय विभाग ' नाशिक' आहे.

● जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते.

● जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. 

● जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. 

● जळगाव जिल्हा हा भारताच्या सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
● कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. 

● जळगाव जिल्हा ही सोने व डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे.

● मराठी भाषेबरोबरच येथे अहिराणी भाषा देखील बोलली जाते.

● भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटिल या जिल्ह्यातील आहेत. 

● प्रसिद्ध मराठी कवित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या.

● बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले.

● बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील होते. 

● २०१४ ला ज्ञानपीठ प्राप्त प्रथितयश लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धों. महानोर हे देखील जळगावचे भूषण आहेत.

● जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे.

● जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे.

● जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे.

● जळगाव जिल्ह्यात बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत.

● जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.

● जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो.

● जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे.

● जैन इरिगेशनचे संस्थापक, भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात ‘गांधी तीर्थ’चे निर्माण केले आहे.

● जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत.

● जळगाव जिल्ह्यात एकूण १५ तालुक्यांचा समावेश होतो.
अमळनेरएरंडोलचाळीसगावचोपडाजळगावमुक्ताईनगर , जामनेरधरणगावपाचोरापारोळाबोदवडभडगावभुसावळयावल व रावेर.

● भुसावळ येथे युद्धसाहित्य निर्मिती केंद्र आहे. 

● साने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते.

◆ एरंडोल शहरात 300 वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदीर आहे. 

● चाळीसगाव येथे विडी कारखाने आहेत. 

● चोपडा येथे गरम पाण्याचे झरे आहेत. 

● मुक्ताईनगर तालुक्यातील उत्तरेकडील जंगलात कोल्ह्यांचे अस्तित्व आहे. 

● धरणगाव तालुका कापसाच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

● पारोळा हे झाशीच्या राणीचे माहेर आहे.

● भृगू ऋषीच्या वास्तव्य मुळे ह्या शहराला भडगाव नाव मिळाले. 

● भुसावळ हे तापी नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. 

● तापी नदी भारतातील एक प्रमुख नदी असून तिची लांबी ७२४ किलोमीटर इतकी आहे . 

● तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल येथे होतो. 

● नर्मदा आणि तापी ह्या नद्या पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात.

● भुसावळ येथे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे.

● भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी भुसावळ हे एक आहे.

● भुसावळ येथे एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे.

● यावल या ठिकाणी व्यास मुनींचे भव्य असे 'व्यासमंदिर' आहे.

● रावेर तालुका हा देशभरात केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. 

● रावेर तालुक्यात पाल हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणं आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 


10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER

10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER

10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST

10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.

आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769

धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

09) चंद्रपूर

03) अहिल्यानगर ( Ahilyanagar )