32) सांगली ( Sangli )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग बत्तीसावा दिनांक :- 26 मे 2023 वार - शुक्रवार

32) जिल्हा - सांगली माहिती

◆ सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. 

◆ जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. 

◆ पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. 

◆ जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. 

◆ कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

◆ सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत :- शिराळावाळवातासगांवखानापूर (विटा)आटपाडीकवठे महांकाळमिरजपलूसजत व कडेगांव

◆ जिल्हयात सांगली मिरज व कुपवाड ही महानगरपालिका तसेच इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस व जत या सहा नगरपालिका कार्यरत आहेत. तसेच कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, खानापूर या चार नगरपंचायती कार्यरत आहेत.

◆ येथे विष्णूदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.

◆ औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांचा जन्म येथे झाला. 

◆ उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

◆ सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. 

◆ वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१चा सहकारी साखर कारखाना आहे.

◆ सांगलीच्या आसपासचा परिसर कुंडल चालुक्यांची राजधानी होती. कुंडल हे 1,600 वर्ष जुने प्राचीन गाव आहे. कौंडण्यपूर (कुंडलचे जुने नाव) कर्नाटकचा एक भाग होता. 

◆ कुंडल हे क्रांतिसिह नाना पाटील, क्रांतिवीर कॅप्टन आकाराम (दादा) पवार, श्यामराव लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, जी.डी लाड, शंकर जंगम आणि हुसाबाई जंगम या स्वातंत्र्य सैनिकांचे घर होते. 

◆ स्वातंत्र्यपूर्व काळात इ. स. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा जंगल सत्याग्रह झाला होता. 

◆ गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.

◆ मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.

◆ मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

◆ सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. 

◆ सांगलीची हळद आणि येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. 

◆ उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. 

◆ अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. 

◆ याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

◆ जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत.

◆ जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.

◆ सांगली जिल्हा कृष्णावारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे.

◆ कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे.

◆ सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले.

◆ सांगली येथे श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन संस्थानिक यांनी कृष्णा नदीकाठी इ.स. १८४५ मध्ये बांधलेले गणेश मंदीर तसेच हरिपूर मार्गालगत बांधलेले बागेतील गणेश मंदीर ही सांगलीच्या जनतेची श्रद्धास्थाने आहेत. 

◆ तासगांव येथील मराठयांचे दक्षिणेतील सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगांव येथे भव्य गोपूर असलेले गणेश मंदीर इ.स. १७९९ मधे बांधले असून ते अति प्राचीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. 

◆ सांगली जिल्हयामध्ये चांदोली हे अभयारण्य रत्‍नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्हयाच्या सरहद्दीवर आहे 

◆ कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सागरेश्वर अभयारण्य वाळवा खानापूर व तासगांव तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. 

◆ मिरज तालुक्यतील ख्वाजा मीरासाहेब दर्गा हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात. 


◆ श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री गुरुदेव दत्त मंदीर हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले आहे. 

◆ बहे तालुका वाळवा येथील रामलिंग मंदीर, किल्ले मच्छिंद्रगड येथील नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथाची समाधी आहे.

◆ मिरज व कवठे महांकाळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या दंडोबा डोंगरावर शिवमंदीर आहे.

◆ कवठे महांकाळ येथे महाकाली देवीचे मंदिर आणि मल्लिकार्जुन (देव शिव) मंदिर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. 

◆ मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.

◆ प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.

◆ ब्रम्हनाळ येथील कृष्णा येरळा नदयांच्या संगमाजवळील महादेव मंदीर प्रसिद्ध आहे.

◆ जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे.

◆ जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव दानम्मा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. लिंगायत समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे.

◆ रेणावी तालुका खानापूर येथे रेवणसिद्ध समाधी आहे.

◆ भिवघाट नजीक शुकाचार्याची समाधी आहे. 

◆ बत्तीस शिराळा येथे दरवर्षी नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते. तसेच नागाची मिरवणूक काढून नाग खेळवले जातात दरवर्षी नाग पंचमीस सर्व देशभरातून तसेच परदेशातून हजारो लोक येत असतात.

◆ बत्तीस शिराळा येथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे.

◆ या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच 'बत्तीस शिराळा' होय.

◆ तासगाव शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील  प्रसिद्ध द्राक्षे आहेत.

◆ तासगांवचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.

◆ तासगांवचा उजव्या सोंडेचा गणपती खुप प्रसिद्ध आहे. 

◆ तासगांवला गणपतीचं तासगांव, द्राक्षाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

◆ जनावरांचा देशातील सर्वांत मोठा बाजार खरसुंडी येथे भरविला जातो

◆ मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. 

◆ चित्रपट संगीतदिग्दर्शक बाळ पळसुले ही सांगलीचेच.

◆ वसंतदादा पाटील यांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात झाला.

◆ सांगलीतील चिंतामणि मोटर्स ही भारतात मॉडीफाईड गाडी बनवण्यासाठी ओळखले जाते.

◆ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.

◆ क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिन्द्रयेथे झाला.

◆ गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. 

◆ पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म सांगलीत झाला.

◆ व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावी झाला.

◆ नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील नागठाणे याठिकाणी झाला.

◆ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. 

◆ दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली सांगली जिल्ह्यात करगणी या गावी झाला.

◆ संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियानाचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी येथे झाला.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

सांगली जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )