29) लातूर ( Latur )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग एकोणतीसावा दिनांक :- 23 मे 2023 वार - मंगळवार

29) जिल्हा - लातूर माहिती

● लातूर हे महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. 

● जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. 

● उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 16 ऑगस्ट 1982 या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.

● लातूर जिल्ह्यात 2 लोकसभा व 6 विधानसभा मतदारसंघ आहेत.

● लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.

● लातूरला मांजरा नदीतून पिण्याचे पाणी मिळते.

● लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - केशवराव सोनवणे, विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर 

● केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र चाकूरला व बाभळगाव (लातूर) येथे आहे.

● लातूर संपूर्ण भारतात कडधान्ये व विशेषतः तूर डाळीसाठी प्रसिद्ध आहे.

● लातूरमध्ये आंब्याची केशर नावाची जात विकसित झालेली आहे.

● केशवराव सोनवणे यांनी सहकारी तत्त्वावर डालडा कारखाना स्थापन केला.

● भारताच्या सर्वात मोठे सोयाबीनचे व्यापार केंद्र लातूर आहे. 

● या नगरास महाराष्ट्राचा साखरपट्टा म्हटले जाते. तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. ते भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक आहे.

● दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख स्टेशन आहे.

● १९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. 

● १९८८मध्ये समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी लातुरात 'महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेची स्थापना केली.

● लातूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय आहे.

● लातूर शिवाजी नगर मध्ये 1989 मध्ये निर्माण झालेले अष्टविनायक मंदिर आहे.

● उदगीर येथे भुईकोट किल्ला आहे, किल्ल्यात अरबी व फारशीत लिहिलेले काही दुर्मिळ कोरीव लेख आहेत.

● उदागिर बाबा मुळे उदगीर शहर प्रसिद्ध झाले.

● उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे.

● उदगीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे.

● सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे तयार केले जाते.

● औसा येथील भुईकोट किल्ला ३६.५८ मीटर रुंद खंदकाने किंवा चराने वेढलेला आहे. हा चर कोरडा आहे.

● सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. त्याने "करंडक चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे.

● या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई"असा उल्लेख केला आहे. 

● प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नावे रूढ झाली असावीत.

● तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बांधलेले केशव बालाजी मंदीर औसा येथे आहे.

● निलंगा येथे 6व्या शतकातील लेण्या आहेत. खरोसा लेणी असे त्याचे नाव आहे.

● लातूर शहरात गंजगोलाई आहे, नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली.

● पाच गावांच्या सीमेवरील शेळगाव हे चाकूर तालुक्यातील मल्लप्पा शिव मंदिरासाठी विख्यात आहे.

● चाकूर तालुक्यातील वडवळ येथे नागनाथ मंदिर आहे.

● वडवळ येथील वनस्पती बेट ही टेकडी दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतींचे माहेरघर आहे.

● साई नंदनवन हे चाकूरजवळील आणखी एक पर्यटन स्थळ. ४०० एकर (१.६ चौ.किमी.) मध्ये पसरलेले आहे, इथे आंब्याचा मळा, जल उद्यान व मनोरंजन उद्यान आहे. उद्यानाच्या केंद्रात एक सत्यसाईबाबा मंदिर आहे.

● लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड चाकूर तालुक्यात आहे.

● सिद्धेश्वर मंदीर हे लातूरचे ग्रामदैवत आहे. इथे दरवर्षी १५ दिवसांची जत्रा असते.

● अहमदपूरचे जुने नाव राजूर असे होते.

● जळकोट येथील महादेवाचे मंदिर लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

● देवणी हे गाव तेथील 'देवणी' गायींसाठी प्रसिद्ध आहे.

● हरिहरेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाणारे निलंगा येथील निळकंठेश्वराचे मंदिर केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मंदिर आहे.

● रेणापूर हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदीर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले.

● शिरूर येथे अनंतपाळ (महाराजाचे) देवाचे भव्य असे पौराणिक मंदिर आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

लातूर जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )