30) वर्धा ( Vardha )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग तीसावा दिनांक :- 24 मे 2023 वार - बुधवार
30) जिल्हा - वर्धा माहिती
● वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
● जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही.
● पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे.
● वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
● वर्धा जिल्ह्यात 08 तालुके आहेत -
● वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत.
● वर्धेचे पूर्वीचे नाव पालकवाडी होते. वर्धा नदीच्या नावावरूनच या ठिकाणाला वर्धा हे नाव देण्यात आले.
● सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे.
● सन १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधीजींचे निवासस्थान होते. परिसरात बापू कुटी आहे.
● सन १९६९ मध्ये मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शिवराम रेगे होते.
● वर्धा येथे हिंदी भाषेचे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे.
● भारतीय रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील एक मोठे स्थानक आहे.
● वर्धा शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे.
● वर्धा शहर आता कापूस व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र आहे.
● वर्धा शहरापासून काही अंतरावर विनोबा भावे यांचा परमधाम पवनार आश्रम आहे.
● स्वर्गीय जमनालाल बजाज यांनी वर्धा येथे १९ जुलै १९२८ रोजी ‘हरिहंस’ लक्ष्मीनारायण मंदिर उघडले.
● स्वर्गीय जमनालाल बजाज यांचे बजाजवाडी येथे निवासस्थान आहे. याठिकाणी स्वातंत्र्य संग्रामातील अनेकांनी येथे मुक्काम केले.
● सेलू तालुक्यातील बोरी या गावाजवळ बोर नदीवर बोर धरण बांधले आहे. धरणाच्या परिसरात सुंदर उद्यान असून, ते पर्यटन स्थळ (Tourist destination) म्हणून घोषित करून राखीव जंगल विकसित केले आहे. हे ठिकाण वनस्पती आणि जीवजंतूंनी परिपूर्ण आहे आणि तेथे घनदाट जंगल आहे.
● वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्प असून त्यात वाघ, कोल्हा, हायना, स्लॉथ बेअर असे वन्य प्राणी दिसतात. मोर मुबलक प्रमाणात आहेत.
● समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे मुस्लिम धर्मातील प्रसिद्ध संत शेख फरीद बाबा यांची समाधी आहे.
● केळझर येथे विदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले वरद विनायकाचे मंदिर आहे.
● भारतातील आठ शांती स्तूपांपैकी एक शांती स्तूप वर्ध्यात उभारण्या्त आला.
● विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केलेले गीताई पुस्तकातील अध्याय गीताई मंदिरात उभ्या दगडांवर कोरले आहेत.
● महात्मा गांधींनी लिहिलेले पुस्तके गांधी ज्ञान मंदीर येथे वाचावयास मिळतात.
● ग्रामोद्योग आणि ग्रामविकासाच्या संकल्पलनेवर आधारीत असलेले ऐतिहासिक असे मगन संग्रहालय आहे.
● 1936 साली राष्ट्र भाषा प्रचार समितीची सुरुवात वर्ध्यात करण्यात आली.
- ऐतिहासिक जामा मस्जिद (किंवा मुकबरा मस्जिद) आष्टी तालुक्यातील पेठ अहमदपूर मध्ये मुघल साम्राज्यातील नवाब अहमद खान नियाझी याने बांधले होते.
- भगवान शिव यांना समर्पित कपिलेश्वर धाम मंदिर खूप सुंदर आहे. दरवर्षी या मंदिरात यात्रा भरते.
- पोस्ट ऑफिस आष्टी जवळ विठ्ठल मंदिर एक ऐतिहासिक मंदिर आहे. जे ब्रिटीश कॉलिनमध्ये बांधले गेले होते.
- नवाब मुहम्मद खान नियाझी मकबरा.हा मकबरा सम्राट अकबरच्या काळात बांधला गेला होता. जे मुघल शैलीत बांधले गेले आहे.हे मकबरा खरप दगडाने बनवले होते. आज पेठमहादपूर येथे जामा मस्जिद पेठमहादपूर मुकबारा स्थित आहे.
- लोधी मशिद एक ऐतिहासिक मशिदी आहे जी ग्रामपंचायत पेठमहादपूर जवळ आहे.मशिदीवरील शिलालेखानुसार मशिदी इब्राहिम खान लोधी यांनी बांधली होती. या मशिदीत 6 घुमट आहे
- पीर बाबा दर्गा टेकडीच्या शिखरावर आहे. ही सूफी संताची समाधी आहे दरवर्षी उर्स येथे आयोजित केले जाते.
- राज्य महामार्गावर शहीद स्मारक आहे जे स्वातंत्र्यसैनिकाच्या सन्मानात तयार केले गेले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष. आष्टीमध्ये या स्मारकाद्वारे प्रदर्शित केले गेले आहे.
- भारतीय इतिहासात आष्टी या गावाला खूप मोलाचे असे स्थान आहे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आरती मंडळाचे आष्टी हे केंद्रबिंदू आहे.
- मोगलनी बांधलेली बावडी .हे काळ्या दगडाने आणि चुनखडीनी बनवले होते. ही ऐतिहासिक विहीर आहे जी खूप खोल आहे.
- वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किना-यावर हेमाडपंथी असे भगवान शंकराचे मंदिर कोटेश्ववर
याठिकाणी आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका आहे. - हिंगणघाट तालुक्यातील सुंदर निसर्गाने नटलेला पोथरा धरणाचा परिसर आहे. विविध पक्षांनाही हा परिसर हवाहवासा वाटतो. त्यामुळेच या ठिकाणी आपणाला विविध रंगी पक्षी पाहावयास मिळतात. धरणाच्यात जलाशयाची पातळी सर्वत्र सारख्या प्रमाणातच याठिकाणी दिसते.
- प्रवरसेन (पहिला) यांचा नातू तथा रुद्रसेन यांचा पूत्र पृथ्वीसेन याने पोहणा गावाची निर्मिती केली.
- समुद्रपूर तालुका अंतर्गत असलेल्या मांडगावात वेणा, वर्धा आणि यशोदा नद्यांचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळतो. संत मांडो या ठिकाणी बरेच काळ वास्तव्यास असल्याने मांडगाव असे गावाचे नाव पडले.
- आर्वी तालुक्यात महाकाली धरण आहे, तेथे महाकाली देवीचे मंदिर आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
● कुष्ठरोग्यांना मदत करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे ह्यांचा हिंगणघाट येथे जन्म झाला.
● हिंगणघाट हे गाव वेणा नदीच्या काठावर वसलेले आहे.
● टाइम्स ऑफ इंडिया'च्या मते, हिंगणघाटमध्ये राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा साक्षरता दर सर्वात जास्त आहे
● हिंगणघाट शहरात दरवर्षी २८ डिसेंबरला वेणा नदीकिनारी संत गाडगेबाबांच्या स्मृतीत जत्रा आयोजित केली जाते.
● भोसले घराण्यातील सरदार दादोबा बोरकर यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सन 1792 ते 1805 या कालावधीत मल्हारी-मार्तंड या मंदिराची उभारणी हिंगणघाट या ठिकाणी केली आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें