31) वाशिम ( Washim )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग एकतीसावा दिनांक :- 25 मे 2023 वार - गुरूवार
31) जिल्हा - वाशिम माहिती
◆ अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन ०१ जुलै १९९८ रोजी वाशीम हा जिल्हा स्थापन झाला.
◆ वाशीम हे विदर्भाच्या पूर्व भागात आहे.
◆ वाशिम ही वाकटकांची राजधानी होती.
◆ वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म होते.
◆ वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, ऊस आणि हळद ही मुख्य पिके आहेत
◆ वाशिम जिल्ह्यात 6 तालुके आहेत - कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम
◆ वाशिम जिल्ह्यामध्ये गोंड, बंजारा आणि आंध या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात
◆ मालेगाव हा वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे.
◆ वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत.
◆ पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.
◆ कास ही तिची मुख्य उपनदी आहे.
◆ कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावाजवळ मिळते.
◆ अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते.
◆ वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.
◆ वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.
◆ वाशिमपासून काही अंतरावर कोंडला झामरे येथे सर्वात प्रसिद्ध कोंडेश्वर शिवमंदिर आहे.
◆ पद्मतीर्थ हे विष्णूने निर्माण केलेल्या प्रमुख तीर्थांपैकी एक आहे.
◆ वाशिम येथील बालाजीचे मंदिर हे खूप जुने मंदिर आहे आणि ते भवानी काळू यांनी बांधले होते.
◆ वाशिम मधील तर्हाळा हे ठिकाण पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
◆ शिरपूर येथे जैन धर्माचे २३ वे तीर्थंकार अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. जैन धर्मातील भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिराला भेटी देत असतात.
◆ कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती गुरुमहाराज भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार यांचा गुरुदत्त मंदिर आहे.
◆ कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदीर जैन लोकांसाठी देखील महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे.
◆ बंजारा समाजाचे पूजनीय दैवत पोहरादेवी मानोरा तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
◆ पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या मंगरूळपीर शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे.
◆ नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात.
◆ मंगरूळपीर येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर आणि श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आहे.
◆ रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे.
◆ रिसोडला कापसाची व अन्य कृषिउत्पादनांची अधिकृत बाजारपेठ १८९९ साली स्थापन झाली होती.
◆ सिद्धेश्वर मंदिर म्हणजे रिसोड शहराचे ग्रामदैवत असून ते अतिशय प्राचीन मानल्या जाते.
◆ नेतंसा येथील गणपती हे अतिशय प्रसिद्ध आहे येथील मुर्ती ही उजव्या सोंडेची असून मनमोहिनी आहे.
◆ राजा रामचंद्र यांनी स्थापित केलेले प्रभु शंकराचे मंदिर अतिशय निसर्गरम्य नेतंसा येथे आहे.
◆ अमरदासबाबा मंदिर संस्थान हे रिसोड गावातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें