33) सातारा ( Satara )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग तेहतीसावा दिनांक :- 27 मे 2023 वार - शनिवार

33) जिल्हा - सातारा माहिती

● सातारा शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे.

● सातारा जिल्‍हा मराठी राज्‍याची राजधानी होती.

● त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि .मी. इतका होता. 

● ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते.  

● पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे.

● सर्वात जास्त सैनिक असलेले जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे सातारा होय. अपशिंगे गावाची सैन्यात जाण्याची परंपरा आहे.

● दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.

● हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहमनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.

● ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या जिल्ह्याने निर्माण केली आहे.

● सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस - रत्‍नागिरी जिल्हा, वायव्येस - रायगड जिल्हा उत्तरेस - पुणे जिल्हा व दक्षिणेस - सांगली जिल्हा आहे.

● सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत - सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, पाटण, जावळी आणि खंडाळा 

● सातारा शहराच्या जवळ कास पठार / फुलांचे पठार आहे.

● ठोसेघर हे पश्चिम घाटातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. 

● सातारा हे कंदी पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

● अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.  

● समर्थ रामदास स्वामींचे  शेवटचे विश्रांतीस्थान सज्जनगड सातारा जिल्ह्यात आहे.

● प्रतापगड किल्ला महाबळेश्वरच्या पश्चिमेस २५ कि.मी. अंतरावर आहे.

● जरंडेश्वर डोंगरावरील हनुमानाचे मंदिर हे मनमोहक असून या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे मिशा असलेल्या  हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते ! 

● ठोसेघर या छोट्याशा गावाजवळ ठोसेघर धबधबा हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे.

● महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात आहे.

● पश्चिम घाटातील लहान काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेले तापोळा येथे शिवसागर नावाचा एक सुंदर तलाव आहे.

● सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील मायणी येथे पक्षी अभयारण्य आहे.

● भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणजे भांबवली वजराई धबधबा होय. हा धबधबा १८४० फूट (५६० मीटर) उंचीवरून तीन टप्प्यातून कोसळतो.

● सातारा जिल्ह्यात एकूण १५ किल्ले आहेत.

● सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

● जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे. जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास.

● माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील पाटण याच गावाचे आहेत. 

● खटाव हे प्राचीन ठिकाण असून गावचे नावच खट आणि वांग ऋषीच्या नावावरून पडले आहे.

● माण तालुक्यात मेंढपाळ ( धनगर ) समाज जास्त आहे.

● माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. 

● श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे समाधि मंदिर गोंदवले माण तालुक्यात आहे.

● फलटण हे डाळिंबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

● फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे.

● महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाते.

● वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. 

● सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.

● वाईमध्ये समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान मंदिर आहे.

● वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. 

● वाई येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला इ.स. १९०१ पासून सुरू आहे

● नारायण हरी आपटे हे मराठी लेखक कोरेगाव येथे रहात होते. त्यांचा मृत्यू कोरेगांव येथे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी झाला.

● आल्याचे मोठे उत्पादन कोरेगाव परिसरात होत असते. 

● अभिनेत्री उषा चव्हाण हिचे एकंबे हे गाव कोरेगाव इथून ८ किमी अंतरावर आहे.

● कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील हे कोरेगाव तहसील मध्ये मुद्रांक विक्री करीत.

● ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. 

● ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कऱ्हाडमध्ये झाले होते. 

● फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले होते.

● कऱ्हाड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. 

● कऱ्हाडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.

● कराड येथे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे.

● सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्ती - यशवंतराव चव्हाणभाऊराव पाटीलनाना पाटीलखाशाबा जाधवगोपाळ गणेश आगरकरहंबीरराव मोहितेसोयराबाईनावजीबुवा साळुंखे-किवळकरभिकोबा आप्पाजी साळुंखे-किवळकर


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

सातारा जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )