35) सोलापूर ( Solapur )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपले राज्य ; आपला जिल्हा 
भाग पस्तीसावा दिनांक :- 29 मे 2023 वार - सोमवार

35) जिल्हा - सोलापूर माहिती

◆ सोलापूर शहर हा एकूण १६ गावानी मिळून बनलेला आहे म्हणून त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलेले आहे.

◆ महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर पंढरपूर येथे आहे, पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात येते. 

◆ पंढरपूरला दक्षिणेची काशी समजली जाते. 


◆ पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या ( चंद्रभागा ) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. 

◆ आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.

◆ तेलगू, कन्नड आणि मराठी असा भाषा त्रिवेणी संगम झालेला जिल्हा म्हणजे सोलापूर

◆ सोलापूर हा महाराष्ट्रात टॉवेल व चादरी निर्माण करणारा जिल्हा आहे. 

◆ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे.

◆ सोलापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला, ज्या तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे. 

◆ सांगोला तालुका दोन गोष्टीसाठी ओळखला जातो. एक म्हणजे डाळींबासाठी व दुसरे म्हणजे एका तालुक्यावर सर्वात जास्त वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे ओळखला जातो. 

◆ सोलापूर ची जुनी नावे - सोन्नलगे, सोन्नलगी, सोनलपूर, संदलपूर, सोलपूर, शोलापूर

◆ स्वातंत्र्यापूर्वीच इसवी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी सोलापूर भारतातील एकमेव नगरपालिका होती. 

◆ सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगलीसातारा व पुणे हे जिल्हे आहेत.

◆ सोलापूर शहरात कंबर तलाव या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारची पशु-पक्षी, प्राणी हे पहावयास मिळतात.

◆ भीमा नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. 

◆ भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. 

◆ नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. 

◆ जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावतीहरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

◆ माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. 

◆ या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. 

◆ भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा बोगदा आणि पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगात ज्वालामुखीचा केंद्र बिंदूआहे. 

◆ सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत - उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा आणि करमाळा

◆ मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

◆ सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. 

◆ साकोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

◆ सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. 

◆ उत्तर सोलापूर मध्ये रानमसले गावात कांदा खूप पिकवला जातो. 

◆ उत्तर सोलापूर तालुका हा सर्वात लहान तालुका आहे.

◆ बार्शी तालुक्यात नारी, नारीवाडी ही गावे द्राक्षे फळ पिकासाठी प्रसिद्ध आहेत.

◆ बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.

◆ बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. 

◆ बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. 

◆ बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शीमध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. 

◆ बार्शीमध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते.

◆ तसेच ईथे "उत्तरेश्वराचे" देखील मोठे मंदिर आहे त्यास बार्शीचा मोठा "महादेव" म्हणतात. 

◆ बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.

◆ जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शीची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत विष्णू मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 

◆ सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. 

◆ सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर समाजाचा मोठा वाटा आहे. 

◆ दक्षिण सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना आहे. 

◆ सोलापूर शहराजवळ किर्लोस्कर कंपनीचा शिवाजी वर्क्स लिमिटेड हा इंजिन ऑटो पार्ट्‌स बनवणारा कारखाना आहे. 

◆ मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी.आय. मानांकनही प्राप्त झाले आहे.

◆ केम येथील हळदीपासून बनवले जाणारे कुंकू प्रसिद्ध आहे. 

◆ पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

◆ सांगोला येथील खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत.

◆ मोहोळ येथे कृषी विज्ञान केंद्र आहे.

◆ सोलापूर हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

◆ माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. 

◆ माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.

◆ माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी हे एक मराठी संतकवी होते.

◆ करमाळा हे कमलादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते.

◆ या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. 

◆ करकंब मधील बाजार आमटी खूप प्रसिद्ध आहे. खूप दूरवरून लोक ही आमटी खाण्यासाठी करकंबला येतात.

◆ सोलापुरातील लंबोटी हे शेंगा चटणी प्रसिद्ध आहे. 

 ◆ ऑगस्ट २००४ मध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

◆ सिद्धरामेश्वर यांनी तळ्याच्या मध्यभागी 68 शिवलिंगाची स्थापना केलेले शिवमंदिर स्थापन केले. देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.

◆ या जिल्ह्यातील अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ २१ वर्षे राहिले होते. अक्कलकोट येथेच त्यांची समाधी आहे


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

सोलापूर जिल्हा प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )