36) हिंगोली ( हिंगोली )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग छतीसावा दिनांक :- 30 मे 2023 वार - मंगळवार
36) जिल्हा - हिंगोली माहिती
◆ हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे.
◆ हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे,
◆ हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली.
◆ हिंगोली जिल्हा पूर्वी परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.
◆ हिंगोली जिल्ह्यात पाच तालुके आहेत - औंढानागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव
◆ जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत.
◆ ज्वारी व कापूस ही हिंगोली जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.
◆ वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते. खुप ठिकाणांवरून येथे भाविक येतात.
◆ बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढानागनाथ हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिवाचे हे मंदीर आहे.
◆ वारंगा मसाई हे गाव मसाई माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावांमध्ये पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी यात्रा भरते. हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे.
- संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेले नरसी नामदेव याच जिल्ह्यात आहे.
- औंढानागनाथचे प्राचीन नाव आमर्दकपूर होते.
- औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे.
- कुरुंदा गावाजवळ टोकाई माता मंदिर आहे.
- वसमत तालुक्यातील आरळ येथे श्री अन्नपूर्णा मात्तेचे जागृत देवस्थान असून हे मंदिर हेमांद्री (हेमाडपंथी) स्थापत्यशैलीचे आहे.
- आंबा येथील अंबादेवी मंदिर प्रसिद्ध आहे.
बाराशिव आणि बोराळा येथे हनुमान मंदिर आहे.
चोंडी बहिरोबा येथे बहीरोबा देवस्थान प्रसिद्ध आहे.
घोटा येथे तुळजादेवी संस्थान आहे.
शेवाळा येथे पूर्णानंद महाराजांचे मंदिर आहे.
समगा येथे संगमेश्वर महादेव मंदिर आहे.
श्री.कानिफनाथ गड खैरी घुमट येथे आहे.
हिंगोली येथे चिंतामणी गणपती आहे.
संत तुकामाई जन्मस्थळ सुकळीविर(तु) आणि समाधीस्थळ येहळेगाव(तु) येथे आहे.
कळमनुरी तालुक्यात श्री संत देवकामाता संस्थान हिवरा तर्फे जवळा येथे आहे.
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची उंच बाहुबलीची मूर्ती आहे. जैन धर्माचे तीर्थस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे
हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाच्या मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव प्रसिद्ध आहे.
हिंगोली शहरात दरवर्षी नवरात्रीत दहा दिवसांचा सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. यात शहरातील रामलीला मैदान भागात मोठी जत्रा भरते. दोनशेहून जास्त वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.
हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानक (HNL) हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येते.
भगवान शांतिनाथ जिनालय हे हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर गावात वसलेले एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें