03) आंध्रप्रदेश ( Andhrapradesh )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य 
भाग दुसरा दिनांक :- 03 जून 2023 वार - शनिवार

03) राज्य - आंध्रप्रदेश माहिती

● आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. 

● २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे.

● १ नोव्हेंबर १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला,

● २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. 

● प्रारंभी काही काळ हैद्राबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर अमरावती या सुनियोजित राजधानीची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसविली.

  • राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  • आंध्रप्रदेशात 26 जिल्हे आहेत.
  • आंध्रप्रदेशच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला कर्नाटक, उत्तरेला तेलंगणा आणि दक्षिणेला तामिळनाडू राज्य आहे. 
  • हैद्राबाद शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो.
  • तिरुपती येथे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले श्री बालाजीचे मंदीर आहे. 
  • बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन मंदीर हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.
  • आंध्रप्रदेशची मातृभाषा तेलगू आहे.
  • आंध्रप्रदेशचा राज्यनृत्य कुचिपुडी आहे.
  • आंध्रप्रदेशचा राज्यखेळ कबड्डी आहे.
  • विशाखापट्टणम या शहराला लोक वैझॅग (Vizag) या संक्षिप्त नावाने ओळखतात.
  • देशातील सर्वात जुन्या बंदर शहरांपैकी एक म्हणजे विशाखापट्टणम होय. 
  • विशाखापट्टणम येथे डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम आहे. 
  • हैद्राबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे.
  • आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील मिरची प्रसिद्ध आहे.
  • आंध्रप्रदेशातील अराकु व्हॅली एक सुंदर आणि रमणीय पर्यटन स्थळ आहे.
  • आंध्रप्रदेश राज्याची राजधानी अमरावती ही कृष्णा नदीच्या काठी वसलेली आहे. 
  • हे शहरातील बुद्ध स्तूपासाठी प्रसिद्ध आहे ज्याला देवाचे निवासस्थान म्हणूनही ओळखले जाते. 
  • विजयवाडा शहर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
  • अनंतगिरी टेकड्या ह्या कॉफीच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • नेल्लोर येथे आंध्र प्रदेशचे कृषी केंद्र आहे. हे तांदूळ आणि भात पिकांसाठी आणि कोळंबी आणि समुद्री खाद्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. 
  • कर्नूल हे शहर रॉयलसीमाचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. 

  • राजमुंद्री हे शहर राजा नरेंद्र यांनी स्थापित केलेले असून गोदावरी नदीच्या काठावरील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. 
  • राजमुंद्री येथे तेलुगू भाषा जन्माला आली असे म्हटल्याने याला बॉर्न सिटी असेही म्हणतात. 
  • श्री वीरभद्र स्वामी मंदिर राजमुंद्री शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदीर आहे.
  • राजमुंद्री हे शहर एक प्रमुख टेक्सटाईल हब देखील आहे. 
  • हॉर्सली हिल्स- हे हिल स्टेशन आंध्रचे उटी म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि पक्ष्यांच्या किमान 113 प्रजातींचे निवासस्थान आहे. 
  • येथे सर्वात मोठे वटवृक्ष आणि सर्वात जुने निलगिरीचे झाड देखील आहे.
  • नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर असून आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि तेलंगणातील नलगोंडा या जिल्ह्यातील सीमेवर आहे.
  • जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवाने बनवलेला धरण म्हणजे नागार्जुना सागर धरण
  • आंध्रप्रदेश मध्ये गोदावरी व कृष्णा ह्या प्रमुख नद्या आहेत.

वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

आंध्रप्रदेश राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE


हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.


आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769


धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )