05) उत्तराखंड ( Uttarakhand )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग दुसरा दिनांक :- 05 जून 2023 वार - सोमवार
05) राज्य - उत्तराखंड माहिती
● उत्तराखंड या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
● उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ. किमी. एवढे आहे.
● या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे.
● उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून आहे.
● हिंदी, गढवाली अणि कुमाऊँनी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.
● तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.
● उत्तराखंडची साक्षरता ७९.६३ टक्के आहे.
● गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत.
● केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत.
● उत्तराखंडच्या पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश आहे.
● उत्तराखंडची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. त्यामुळे हा दिवस उत्तराखंडमध्ये स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.
● 01 जानेवारी 2007 पासून राज्याचे नाव "उत्तरांचल" वरून "उत्तराखंड" असे बदलण्यात आले आहे.
● पारंपारिक हिंदू ग्रंथ आणि प्राचीन साहित्यात या प्रदेशाचा उत्तराखंड असा उल्लेख आहे.
● हिंदी आणि संस्कृतमध्ये उत्तराखंड म्हणजे उत्तर प्रदेश किंवा भाग.
● गंगोत्री आणि यमुनोत्री, गंगा आणि यमुनेचे उगमस्थान, अनुक्रमे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि भारतातील सर्वात मोठ्या नद्या आहेत.
● राज्य उच्च न्यायालय हे नैनितालमध्ये आहे.
● उत्तराखंड हे चिपको आंदोलनाचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते.
● भारतातील खालील राष्ट्रीय उद्याने या राज्यात आहेत - नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान), व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि चमोली जिल्ह्यातील नंदा देवी नॅशनल पार्क, ही दोन्ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे आहेत.
● हरिद्वार जिल्ह्यातील राजाजी राष्ट्रीय अभयारण्य आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील गोविंद पशु विहार आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान ही ठिकाणे आहेत.
● पवित्र गंगा नदीचे उगम मुख्य हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वतरांगामध्ये आहे.
● यमुना नदीचे उगमस्थान देखील याच राज्यात होते.
● गंगोत्री (6614 मी), डूंगिरी (7066), बंदरपूंच (6315), केदारनाथ (6490), चौखंबा (7138), कामेत (7756), सतोपंथ (7075), नीलकंठ (5696), नंदा ही राज्यातील प्रमुख हिमशिखरे आहेत.
● उत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.
● उत्तराखंडमध्ये चुनखडी, रॉक फॉस्फेट, डोलोमाइट, मॅग्नेसाइट, तांबे, ग्रेफाइट, जिप्सम इत्यादींचे साठे आहेत.
● नैनिताल हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.
● मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत.
● हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे.
● ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार म्हणूनही आहे.
● केदारनाथ हे अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
● केदारनाथला पोचण्यासाठी गौरीकुंडपासून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.
● बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले आहे.
● उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग अलकनंदा व मंदाकिनी नद्यांच्या संगमावर वसले आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें