06) ओरिसा ( Orisa )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग दुसरा दिनांक :- 06 जून 2023 वार - मंगळवार
06) राज्य - ओरिसा माहिती
◆ ओरिसा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर, पूर्वेला व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल , उत्तरेला झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण आणि दक्षिणेला व नैर्ऋत्य दिशेस आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.
◆ १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली.
◆ भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
◆ भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत.
◆ क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.
◆ ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
◆ ओरिसा राज्यातील पुरी येथे प्रसिद्ध जगन्नाथ मंदीर आहे.
◆ जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.
◆ कोणार्क येथे सूर्यमंदिर आहे. तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने करविली.
◆ कोणार्क येथील सुर्यमंदिर हे युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे.
◆ ओरिसा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे.
◆ कटक शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.
◆ मयूरभंज जिल्ह्यातील बैदा पोसी येथे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा जन्म झाला.
◆ रुरकेला येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे.
◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस हा देखील रुरकेलामध्ये आहे.
◆ ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात.
◆ कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणामध्ये वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा पुळण आहे.
◆ भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे चांदीपूर या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.
◆ भद्रक या शहराचे नाव भद्रकाली देवीच्या नावावरून ठेवले आहे. या देवीचे मंदिर सालंदी नदीच्या काठावर आहे.
◆ ओरिसा राज्यात चिल्का तलाव हे एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे जे सुंदर दृश्यांनी परिपूर्ण आहे. आशियातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्यातील पाणी (समुद्र आणि ताजे पाणी यांचे मिश्रण) एक पर्यावरणीय आश्चर्य आहे.
◆ भुवनेश्वरमध्ये प्रसिद्ध लिंगराज्य मंदिर आहे.
◆ धौलीगिरीच्या डोंगरांचा समावेश ओडिशातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये होतो.
◆ सिमलीपाल नॅशनल पार्क हे ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात आहे. हे एक अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे. बंगाली सिंह येथे आढळतात. जे पर्यटकांना आकर्षित करतात.
◆ ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा
◆ ओरिसा राज्यातील पिपली व रघुराजपुर हे दोन गावे त्याच्या हस्तकलासाठी अत्यंत मानाचे स्थान आहे.
◆ ओरिसामध्ये 60 पेक्षा जास्त आदिवासी जमाती आहेत.
◆ "डायमंड त्रिकोण" - रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितागिरी. या तीन स्थळांमध्ये बुद्ध धर्मातील सर्वात महत्वाचे व सर्वांत मोठे स्थान आहे.
◆ सुंदरबन व्याघ्र प्रकल्प एक राष्ट्रीय उद्यान आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
खुपच छान उपक्रम !🌹🌹🌹🌹👍👍👍👍
जवाब देंहटाएं