08) केरळ ( Keral )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग आठवा दिनांक :- 08 जून 2023 वार - गुरूवार
08) राज्य - केरळ माहिती
★ केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे.
★ कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत.
★ केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे.
★ भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो.
★ केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली.
★ तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे.
★ केरळ राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत.
★ मल्याळम ही केरळ राज्याची प्रमुख भाषा आहे.
★ पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे.
★ केरळ येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे.
★ पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.
★ केरळ राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे.
★ २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.
★ निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण हे केरळचे वैशिष्ट्ये आहे.
★ पोंगल हा केरळचा महत्त्वाचा सण मानला जातो
★ केरळ मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
★ केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.
★ जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो
★ केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.
★ केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.
★ चेरांची राजधानी वांची येथे होती.
★ ब्रिटिश काळापासूनच या राज्यांमध्ये ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी दिसते
★ ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे.
★ जगभरामध्ये केरळ मधील तरुण हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
★ इ.स.पू. ५७३ मध्ये ज्यू समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले.
★ येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.
★ इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.
★ केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते.
★ केरळ राज्याला ५९० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
★ अन्नामुडी हे केरळ मधील सर्वोच्च शिखर आहे.
★ वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.
★ कासारगोड येथे केरळमधील सर्वात मोठा बेकल किल्ला आहे.
★ कोटायम येथे समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर इलिक्क्कल कल्लू हे लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे.
★ मुनरो बेट हे पाणलोट क्षेत्रातील एक लपलेला मोती आहे जो ८ बेटांच्या समूहातून बनलेला आहे.
★ कक्कथरुथ ( कावळ्याचे बेट ) हे केरळच्या अलाप्पुझामधील पाण्यावरील एक नेत्रदीपक लहान बेट आहे.
★ कुमारकोम हे वेम्बानाड तलावावरील छोट्या बेटांचे एक समूह आहे. हे स्थलांतरित पक्ष्यांचा एक आवडते स्थान आहे.
★ थक्कडी येथील पेरियार व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा वन्यजीव साठा आहे.
★ थक्कडी येथे तलावात खेळणारे हत्ती आणि आजूबाजूला घुटमळणारे वाघ हे पाहण्यासारखे दृश्य आहे.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें