09) गुजरात ( Gujrat )

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम

आपला देश ; आपले राज्य

भाग नववा दिनांक :- 09 जून 2023 वार - शुक्रवार

09) राज्य - गुजरात माहिती

◆ गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. 

◆ गुजराती ही गुजरातची मुख्य भाषा आहे.

◆ गुजरातचे राज्यनृत्य गरबा ( दांडिया ) हे आहे.

◆ गुजरातचा राज्य प्राणी सिंह आहे.

◆ गुजरातचे राज्य फुल झेंडू आहे तर राज्य फळ आंबा आहे.

◆ गुजरातचा राज्य खेळ कबड्डी आहे.

◆ गुजरात राज्यात एकूण 25 जिल्हे आहेत.

◆ जगातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये स्थित आहे. ज्याला ‘Statue of unity’ म्हणतात. 

◆ हा पुतळा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. त्यांच्या प्रतिमेची उंची 182 मीटर आहे. 


◆ गुजरात मधील लोथल येथे भारतातील पहिले बंदर उभारले गेले.

◆ आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर अभयारण्य गुजरात राज्यात आहे.

◆ जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे गिरनार होय.

◆ द्वारका हे श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध आहे. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.

◆ मोढेराचे सूर्य मंदिर हे भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर आहे.

◆ राणीनी वाव हे पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.

◆ सोरटी सोमनाथ येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.

◆ सुरत शहर तापी नदीच्या काठावर वसलेले महत्वाचे शहर आहे.

◆ सुरत हे गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. 

◆ राजकोट हे अहमदाबाद, सुरत आणि वडोदराच्या खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.

◆ सुरत हे कापडगिरण्या व हिऱ्यांना पैलु पाडण्याच्या उद्योगांचे केंद्र आहे.जगातील एकूण 90% हिर्यांची कटिंग व पॉलिश या सुरत शहरात होते.

◆ अहमदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. 

◆ साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे. 

◆ अहमदाबाद हे शहर अहमदशाहने स्थापले होते. 

◆ विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेली भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे.

◆ अहमदाबाद शहराला युनेस्कोने जागतिक वारसा शहर असा दर्जा मिळवणारे अहमदाबाद हे भारतातील पहिले शहर आहे.

◆ महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले साबरमती आश्रम हे ठिकाण अहमदाबाद मध्ये आहे.

◆ रिव्हर फ्रंट याठिकाणी दरवर्षी जानेवारीमध्ये आंतराष्ट्रीय पतंग स्पर्धा घेतली जाते.

◆ सरखेज रोझा येथे राजाचे गुरू शेख अहमदशाह गंज बक्ष यांचा दर्गा आहे.

◆ गांधीनगरजवळ असणाऱ्या अडालज गावामध्ये अडालज वाव ही हजार वर्षे जुनी विहीर आहे.

◆ अक्षरधाम मंदिर - स्वामीनारायण पंथांचे साधारण ३० एकर परिसरात पसरलेले हे सुरेख मंदिर पाहण्यासारखे आहे. स्वामी नारायण पंथाचे आद्य गुरू भगवान श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासारखे आहे.

◆ अहमदाबादच्या सोला या उपनगरात सायन्स सिटी ची स्थापना करण्यात आली. 

◆ २०१७ सालची २५वी राष्ट्रीय बाल विज्ञान सभा येथे भरवण्यात आली होती. या सिटीमध्ये आय-मॅक्स तंत्रज्ञानाने चालवले गेलेले चित्रपटगृह आहे.

◆ संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जातो.

◆ नवरात्राच्या दिवसांत संपूर्ण अहमदाबादेत उत्सवाचे वातावरण असते.

◆ अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे, जे की जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 

◆ भरुच येथे अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत.

◆ राजस्थानच्या अरवली पर्वतातून उगम पावलेली बनास नदी बनासकांठा जिल्ह्यातून वहात वहात शेवटी कच्छच्या रणात विलीन होते.

◆ सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे अधिपती होते.

◆ वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर वसले आहे. 

◆ पोरबंदर महात्मा गांधींचे जन्मस्थान आहे. पोरबंदर श्रीकृष्णचे परममित्र सुदामा साठी पण ओळखले आहे.

◆ पाटण हे शहर येथे असणाऱ्या 'राणीनी वाव' ( सध्याच्या नव्या शंभर रुपयांच्या नोटेवर प्रकाशित आहे ) या पुरातन स्थळामुळे तसेच 'पटोला' साड्यांमुळे प्रसिद्ध आहे.

◆ डांग जिल्ह्यातील डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

◆ नर्मदा नदी ही गुजरात राज्यांतून १६० कि.मी. अंतरापर्यंत वाहते. 

◆ नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. 

◆ नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत.

◆ नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आला आहे.

◆ दाहोद येथे मोगल सम्राट औरंगजेबाचा जन्म झाला होता.

◆  जामनगर येथील रिलायन्स कंपनीचा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना आहे जो की जगातील सर्वात मोठा कारखाना मानला जातो.

◆ भुज हे कच्छ जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने कच्छ हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. 

◆ प्राचीन सिंधू संस्कृती विकसित केलेली पुरातन महानगर ढोलाविरा कच्छ जिल्ह्यात आहे. 

◆ कच्छ भाषा , सिंधी भाषा आणि गुजराती भाषा बऱ्याचदा वापरल्या जातात.

◆ गुजरात राज्यातील आणंद येथील अमूल डेरी ही जगातील सगळ्यात मोठी सहकारी दूध वितरण संस्था आहे.

◆ आणंद जिल्ह्यात वल्लभ विद्यानगर येथे सरदार वल्लभभाई विद्यापीठ आहे.


वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.  

खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. 

गुजरात राज्य प्रश्नमंजुषा

10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE

हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........! 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )