10) गोवा ( Goa )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपला देश ; आपले राज्य
भाग दहावा दिनांक :- 10 जून 2023 वार - शनिवार
10) राज्य - गोवा माहिती
● गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.
● गोवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
● 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 30 मे गोव्यात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
● गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.
● गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो.
● ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते.
● गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते.
● गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे.
● कोकणी व मराठी ह्या गोव्यातील प्रमुख भाषा आहेत.
● शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत.
● येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते.
● गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे.
● गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.
● पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.
● पणजी हे गाव मांडवी नदीच्या काठावर वसले आहे.
● वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव हे महत्त्वाचे शहर आहे.
● इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला.
● १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.
● पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.
● निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
● गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे.
● बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे.
● सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.
● निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे.
● गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे.
● संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.
● विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत होत.
● गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. म्हणतात तर होळीला गोव्यात 'शिमगा' असे म्हटले जाते.
● गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ. गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.
● धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.
● रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते.
● लळित, खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे
● गोव्यातील काही प्रमुख अभयारण्य - भगवान महावीर अभयारण्य, मोले, बोंडला अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, सलीम अली पक्षी अभयारण्य, चोडण
● मांडोवा नदीवरील दूधसागर धबधबा भारतातील चौथ्या क्रमांकावरील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.
● गोव्यामधील नवीन वर्षाचा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे.
● गोव्यात अनेक सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या बीच आहेत.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें